.. शिरूर ते तर्डोबाचीवाडी मार्गावरील बेकायदेशीर बसविण्यात आलेले गतिरोधक.
गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
तरडोबाचीवाडी ते शिरुर या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक गतिरोधक टाकण्यात आल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.शिरूर पासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अनेक वेळा छोटे मोठे अपघात होत असतात. शिरूरच्या दिशेने असणाऱ्या गतिरोधकामुळे अवजड वहाने जागेवर थांबवून कधी कधी पाठीमागे सरकतात यामुळे मागील वहान चालकांना अक्षरशः भिती वाटते. तरी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घ्यावी व लवकरात लवकर गतिरोधक काढावे अशी मागणी वहान चालक व ग्रामस्थ करत आहे.