शुभम वाकचौरे
शिवराज उर्फ भैय्या यांच्या दुःखत निधनानंतर त्याचा वाढदिवस २ मार्च रोजी मा.कै.माई सिंधुताई सपकाळ यांच्या शिरूर येथील अनाथ अश्रमात साजरा करून घोलप कुटुंबियांनी मुलास दिलेल्या वचनाचे क्षणभर दुःख बाजूला सारून केले पालन. अहिल्यानगर येथील युवा उद्योजक श्री.अरूण बंडू घोलप यांचा मुलगा व शिरूर तालुक्यातील बहुजन मुक्ती पार्टीचे शिरूर शहर सचिव व सामाजिक कार्यकर्ते श्री.सागर बंडू घोलप यांच्या पुतण्याचे दिनांक २३ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले.

कायम सामाजिक बांधिलकी जपणारे घोलप कुटुंब आपल्या मोठ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 18 फेब्रुवारी रोजी शिरूर येथील मा.कै. माई सिंधुताई सकपाळ यांच्या द मदर ग्लोबल फाऊंडेशन संचलित श्री मनःशांती छात्रालय येथील माईनगरी येथे नव्याने निर्मित होऊ घातलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी मदत देण्यासाठी गेले होते. तेव्हाच शिवराज याचा २ मार्चला वाढदिवस माईंच्या मुलांन सोबत साजरा करून मुलांनसाठी ट्रॅक सूट देण्याचे तसेच मुलांना जेवण देण्याचे शिवराज यास त्याचा चुलता शेखर घोलप याने वचन दिले होते.
पण नियतिने शिवराज यास 23 फेब्रुवारी रोजी आपल्या मधून नेऊन वेगळा खेळ खेळला.या दुःखा तुन सावरण्या आधीच 2 मार्च ला शिवराज याचा वाढदिवस आला.
आपल्या उमलत्या मुलाच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून शिवराज उर्फ भैय्या याचा वाढदिवस श्री मनःशांती छात्रालय मधील मुलांन सोबत साजरा करण्याचे वचन संपूर्ण घोलप कुटुंबाने एकत्रित येऊन २ मार्च रोजी पुर्ण केले. श्री मनःशांती छात्रालय येथील मुलांना ट्रॅक सूट, लहान मुलांना Intelligence Book ,२ मार्च व ४ मार्च रोजी सर्वांना जेवन देऊन आपल्या मुलाची इच्छा पूर्ण केली.
शिवराज उर्फ भैय्या याच्या बहिणी पायल,सायली,भक्ती,आनंदी व त्याचे मित्र यांनी आपले अश्रू क्षणभर बाजूला सारून माईंच्या मुलांना आपल्या हाताने जेवण वाढून आपल्या भावास वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट शिवराज फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले.