गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ

गोलेगाव ता.२० येथील कृष्णामाई क्रिडा व ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थ याच्या वतीने शिव जयंती उत्सव मोठ्या थाटात पार पडला. शिव जयंतीनिमित्त विविध काकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ता. १८ रोजी रात्री १० वाजता गोलेगाव याठिकाणाहून शिवज्योत आणण्यास शिवनेरी किल्ल्याकडे गोलेगाव येथील मच्छिॅद्र गायकवाड योगेश इंगळे तुषार पडवळ निलेश बांदल स्वप्निल पडवळ पांडुरंग बांदल राजवर्धन पडवळ अमोल पडवळ अमृत वाखारे विकास पडवळ अक्षय वाखारे नाना कोळपे प्रेम पडवळ जीवन पडवळ प्रतिक इंगळे अक्षय भंडलकर तेजस गायकवाड सार्थक चव्हाण वेदांत गायकवाड स्वराज गायकवाड सतिश वाखारे सुहास पडवळ साहिल मुळे आकाश सादगिले चेतन पडवळ सोहम भोगावडे व कृष्णामाई क्रिडा व ग्रामविकास मंडळाचे सदस्य यांनी प्रस्थान केले. छत्रपती शिवाजी महाराज याचे जन्मस्थळ असणारे किल्ले शिवनेरी किल्ल्यावर “छत्रपती शिवाजी महाराज कि जय ” शिवगर्जना देत मशाल पेटवून गोलेगावकडे मार्गस्थ झाले. ता.१९ रोजी सकाळी सात वाजता शिरूर येथील शिरूर बाजार समितीत असणारे छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्यास पोलीस पाटील संदीप भोगावडे व मच्छिॅद्र गायकवाड याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिरूर ते गोलेगाव या मार्गाने मशाल हातात घेऊन धावत एक एक शिवभक्त गोलेगावकडे रवाना झाले.यावेळी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पोलीस पाटील संदीप भोगावडे याच्या वतीने अल्पोपाहार देण्यात आला.गावठाण परिसरात आगमन होताच शिवज्योत मशाल व शिवभक्ताचे पूजन करण्यात आले. सायं ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष तालुकाध्यक्ष शिवाजी कुर्‍हाडे सरपंच दिपाली पडवळ उपसरपंच निलेश बांदल पोलीस पाटील संदीप भोगावडे ओंकार वर्पे नितिन चव्हाण तुषार पडवळ व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवव्याख्याते राहुल नलावडे याचे व्याख्यान झाले. नंतर रात्री १० वाजता अक्षय वाखारे व सचिन वाखारे याच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज याचा ” छावा ” चित्रपट आलेल्या ग्रामस्थांना पडद्यावर दाखविण्यात आला. शिरूर राष्ट्रीय समाज पक्ष तालुकाध्यक्ष शिवाजी कुर्‍हाडे तसेच कृष्णामाई मंडळ यांनी अन्नदान दिले. यावर्षी शिवजयंतीचे १६ वर्ष होते. तसेेच शिवजयंती उत्सवानिमित्त अनेक मान्यवर व ग्रामस्थ यांनी वर्गणी जमा केली. कार्यक्रमाचे नियोजन कृष्णामाई क्रिडा व ग्रामविकास मंडळ यांनी केले होते.फोटोओळी…. गोलेगाव येथील कृष्णामाई क्रिडा व ग्रामविकास मंडळातील सदस्य यांनी शिरूर येथील बाजार समिती प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button