जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
दोन दिवसापूर्वी पुणे नाशिक महामार्गावर 14 नंबर या ठिकाणी झालेले भीषण अपघातात नऊ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व त्यानंतर लगेचच त्यांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण मधील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे .
18 आणि 19 जानेवारी या दोन दिवसात जुन्नर चे ट्राफिक विभाग प्रमुख वनवे आणि खंडागळे यांनी जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लेण्याद्री फाटा या ठिकाणी सात पेक्षा जास्त पॅसेंजर असणाऱ्या दोन्ही को गाड्यांवरती कारवाई केली आहे . 19 जानेवारी 2025 रोजी एकूण 19 वाहतूक करणाऱ्यांवरती केसेस करण्यात आले असून त्यातून 37 हजार 300 इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे त्याचप्रमाणे त्याच दिवशी दोन अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून वीस हजार रुपये व अनपेड दंड पाच केसेस यांच्याकडून 2700 भरून घेतले असून 18 जानेवारी चे अवैध प्रवासी वाहतूक तीन दंड तीस हजार रुपये असे दंडाची वसुली करण्यात आल्याची माहिती जुन्नर वाहतूक विभागाचे अधिकारी वनवे यांच्याकडून मिळाली .
सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार जुन्नर चे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.