जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे
तालुका शिक्षक लोकशाही आघाडी ( टी.डी .एफ.),जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षका संघ व जुन्नर तालुका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन 2024 / 25 चा तालुकास्तरीय गुणवंत शिक्षकपुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक या विद्यालयातील सौ. कवडे शोभा पांडुरंग उपशिक्षिका M.Sc.B.Ed.यांना रविवार दिनांक 12.1.2025 रोजी शुभश्री मंगल कार्यालय ओतूर येथे जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय श्री. शरद दादा सोनवणे, माननीय श्री रावसाहेब आवारी – संस्थापक अध्यक्ष अखिल महा.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, माजी आमदार माननीय श्री.बाळासाहेब दांगट, माननीय श्री. जी. के.थोरात -अध्यक्ष महाराष्ट्र टी. डी. एफ. , श्री. के. एस. ढोमसे कार्यवाहक – महाराष्ट्र टी. डी. एफ. , माननीय श्री . पंकज घोलप सर अध्यक्ष- पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील अनेक मान्यवर आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.