शिरूर प्रतिनिधी
दिवंगत आमदार लोकनेते बाबुरावजी पाचर्णे साहेब यांच्यानंतर जनसा देमान्य लोकांचा हक्काचा माणूस म्हणून पाचर्णे कुटुंबातून नाथाभाऊ पाचर्णे यांच्या रूपाने नवीन चेहरा निरंतर चालवणार संघर्षयोध्याची लढाई.बहुजन मुक्ती पार्टीचे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन !बहुजन मुक्ती पार्टीचे नेते नाथाभाऊ पाचर्णे यांनी शिरूर हवेली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे दिवंगत लोकनेते आमदार बाबुरावजी पाचर्णे साहेब यांच्यानंतर शिरूर हवेलीच्या राजकारणात पाचर्णे आडनावाचं गेल्या 35 वर्षात घोंगावत असलेले वादळ शांत होतय की काय याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. या पंचवार्षिकला पाचर्णे निवडणुकीला उभे असणार की नाही? अशी चर्चा सुरू होती.निवडणुक अर्ज भरताना बहुजन मुक्ती पार्टीने शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात भव्य शक्ती प्रदर्शन या निमित्ताने केले आहे. महा आघाडी चे उमेदवार श्री.अशोक पवार,महायुतीचे उमेदवार श्री.माऊली आबा कटके,बहुजन मुक्ती पार्टी चे नाथाभाऊ शिवराम पाचर्णे यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार श्री.शिवाजीराव कुर्हाडे,अपक्ष संजय पाचंगे,प्रदीप दादा कांड अशा प्रमुख उमेदवारांमधे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात तुंबळ लढत रंगणार हे स्पष्ट आहे.नाथाभाऊ शिवराम पाचर्णे : सर्वसामान्यांचा आधार!
….श्री.नाथाभाऊ पाचर्णे हे एक उच्चशिक्षित व अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून शुन्यातुन प्रवास करणारे व्यक्तिमत्व आहे.विद्यार्थी,पालक यांना शिक्षण संधर्भात असणाऱ्या समस्या, शिरूर तालुक्यातील खाजगी शाळांचा भ्रष्टाचारास आळा बसला पाहिजे यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केलेली आंदोलने आणि त्याचे फळरुप कोट्यवधी रुपयांची फी सवलत, शेतकऱ्यांचे प्रश्न व छोट्या व्यापाऱ्यांसाठी बाजारपेठ साठी आंदोलने, बेकायदेशीर वुक्षतोड करून चोरी करत असलेल्या अधिकाऱ्यांना दंड तसेच शिक्षा करण्यासाठी केलेले आंदोलन तसेच सामान्य माणसांना प्रशासन व्यवस्थेत काही अडचण आल्यास तत्काळ मदतीला उभा असणारा सामान्य लोकांचा हक्काचा माणूस अशी त्यांची शिरूर,पारनेर व श्रीगोंदा या तीनही तालुक्यात मोठी ओळख आहे.सर्वसामान्य माणसात वावरणारे ते कार्यकर्ते आहेत. बालवाडी ते पदवी पर्यंत मोफत शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काची सर्व सुविधायुक्त बाजारपेठ, व शेतमालाला हमीभाव, शिरुर तालुक्यात असलेल्या रांजणगाव एम आय डी सी मधे स्थानिक भूमिपुत्रांना व सुशिक्षित तरुणांना त्यांच्या हक्काचा रोजगार मिळावा, औद्योगिक वसाहती मूळे होणाऱ्या प्रदूषणावर आवश्यक उपाययोजना तत्काळ करणे,सर्वसामान्य माणसांना, मोफत, उत्तम दर्जाचे शिक्षण, सुसज्ज आरोग्य सुविधा, तरुणांना रोजगार मिळावाया त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.नाथाभाऊ पाचर्णे हे स्वत: व्यवस्थापन शास्त्र मध्ये एमबीए, प्रशासन व्यवस्थापन मध्ये एमए – लोकप्रशासन तसेच विधी शास्त्रात एलएलबी पदवीधर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून नाथाभाऊ पाचर्णे हे शिरुर हवेली विधानसभा मतदार संघासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्र सह प्रशासन व्यवस्थेमध्ये त्यांचा चांगला अनुभव आहे. शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात अनेक विद्यार्थी,पालक,शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आपला माणूस अशी त्यांची ओळख असल्याने या विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित प्रचंड धनशक्ती असणाऱ्या नेत्यांच्या विरोधात सर्वसामान्य स्वाभिमानी मतदारांच्या साथीने नाथाभाऊ हे मोठे मतदार खेचण्यात यशस्वी ठरतील असे चित्र दिसत आहेत. असे घडल्यास शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातील समीकरणे बदलु शकतात.तसेच नाथाभाऊ पाचर्णे यांना सर्व बहुजन समाजाची मते मिळतील.कारण बहुजन मुक्ती पार्टी हा ”बहुजन ‘ चळवळीतील एक महत्वाचा पक्ष आहे, त्यामुळे बहुजन समाजाच्या मतरुपी आशीर्वादाने त्यांना भरघोस मते मिळतील असा त्याना विश्वास आहे.जोरदार शक्ती प्रदर्शन. …उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या संख्येने पायी,दुचाकी आणि चारचाकी वाहनांतुन महिला,पुरुष मोठ्या संख्येने न्हावरा फाटा,शिरुर येथुन शिरुर तहसिल कार्यालय परिसरात जमा होउन नाथाभाऊ पाचर्णे यांना समर्थन करण्यासाठी जमला होता.त्यामुळे मतदारांचे लक्ष वेधुन घेण्यात बहुजन मुक्ती पार्टीला यश मिळाले आहे. हे आज स्पष्ट दिसत आहे.पक्षाचे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने.
..यावेळी प्रमुख उपस्थिती बामसेफ संघटनचे राष्ट्रीय महासचिव गोरखनाथ वेताळ, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य विधानसभा प्रभारी सचिन भाऊ बनसोडे, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष फिरोझ सय्यद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.