शिरूर तालुका प्रतिनिधी :शकील मनियार
कंबोडिया येथे झालेल्या एशियन सिनीअर किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये चॅम्पीयन किक बॉक्सिंग ॲकडमी घोरपडे पेठ पुणे चा देवेन कवी रेणुसे यांने ७४ वजन गटामध्ये सिल्व्हरपदक पटकावत देशपातळीवर महाराष्ट्रातील पुण्याची ओळख निर्माण केली.
या स्पर्धेमध्ये२४ देशांच्या ६१८ खेळांडूनी सहभाग घेतला होता.भारतीय खेळाडूंनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून ६ सुवर्ण,१७ रौप्य,१६ कांस्यपदक मिळवून सांधिक पाचवा क्रमाक मिळवला. राज्यातुन विविध जिल्ह्यातून खेळलेले खेळाडू साईली कंहत हीने५० वजनगटात लाईट कॉन्टॅक्ट गोल्ड पदक, किक लाईट प्रकारात सिल्व्हर पदक, शंतणु सागर ९१ वजनगटात सिल्व्हर पदक, कार्तिक राठोड ९४ वजन गटात सिल्व्हर पदक, आमन पवार हार्ड स्टाईल वेपन प्रकारात सिल्व्हर पदक, ऋतिक बंडेवार ७५ वजन गटात सिल्व्हर पदक, दिया प्रकाश गावले ६० वजन गटात ब्राझ पदक प्राप्त करून देशाचे नाव उंचावले.अध्यक्ष वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन चे संतोष अग्रवाल, किक बॉक्सिंग असो.महाराष्ट्र अध्यक्ष निलेश शेलार म्हणाले की किक बॉक्सिंग खेळाचा प्रचार पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात घडवून भारताचे नाव देशपातळीवर पोहचवण्यासाठी राज्यातील पंच कोचेस यांचे संघटन करून उत्कृष्ठ खेळाडू निर्माण करत किकबॉक्सिंग खेळाचा प्रचार प्रसार करुण महाराष्ट्र राज्य अग्रेसर बनवू त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करू.
असो.पुणेचे अध्यक्ष रुपेश परदेशी यांनी देवेण रेणूसे या खेळाडूला प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन केले.या खेळाडूचा दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ कर्वेनगर,विजय पारगे मित्र परिवाराकडून सन्मान केला,असो. सेक्रेटरी धीरज वाघमारे,पत्रकार संघाकडून तसेच पुणे अध्यक्ष शौकत मुजावर, शकील मननियार पत्रकार बांधव तसेच हुमन राईट फाऊंडेशनचे भारत चे अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, नातेवाईक,मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.