प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
केंदूरकरांचे शिक्षणातील योगदान कौतुकास्पद असून प्राचार्य ए.टी .साकोरे यांनी गावचे भूषण आणि नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिपक कृष्णाजी साकोरे यांचे तसेच समस्त ग्रामस्थ केदूरमधील शाखेचे आणि संस्थेचे हितचिंतक,मार्गदर्शक यामधून परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या उदात्ते हेतूने दिलेल्या भौतिक सुविधां देखील वाखण्याजोगे असल्याचे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक बुद्धीसाठी बॉक्सिंग सारखे गेम, सायकल बँक ते मानसिक ज्ञानवृद्धीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी विद्यालयात काम सुरू आहे .”ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार ” हे ब्रीद घेऊन विशेषत: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील,खेड्यापाड्यातील गोरगरीब बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे अशा उद्दात्त हेतू आणि दूरदृष्टीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरची स्थापना केली.आज महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात आणि कर्नाटक राज्यात संस्थेच्या ४०७ विद्याशाखा ७००० पेक्षा जास्त गुरुदेवशिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि सध्या ५५००००विद्यार्थीविद्यार्थिनी ज्ञानार्जन करत असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या गुणवत्तापूर्ण काम करत आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर ही भारतातील शिक्षकांनी चालवलेली एकमेव शिक्षण संस्था असून सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व जु.कॉलेज केदुर ता. शिरूर जि.पुणे हे संस्थचे एक उपक्रमशील गुणवत्तेने बहरलेले विद्यालय आहे.विद्यालयात जपानी भाषा प्रशिक्षण,स्टेम लॅब मार्फत कोडींग प्रशिक्षण,गावातील आय.पी एस.अधिकारी दिपक कृष्णाजी साकोरे यांचे योगदान आणि मार्गदर्शन यामधून सुसज्ज लेफ्टनंट कृष्णाजी गेनुजी साकोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,सर्व वर्गात ई लर्निग सुविधा,इनडोअर बॉक्सिंग,कॅरम बोर्ड, मल्लखांब,आर्चरी प्रशिक्षण,इ.८वी शिष्यवृत्ती,एन.एम.एम.एस.स्पर्धा परीक्षा यामधील गुणवत्तेचा चढता आलेख,डॉ.सी व्ही रमन,डॉ.होमी भाभा,गणित ऑलिम्पियाड यासारख्या विज्ञान आणि गणिताचे स्पर्धा परीक्षा यामधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे यश,विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना शाळेत जाणे येणे साठी लोकवर्गणी मधून सायकल बँक सारखे उपक्रम यामुळे शाळेचा लौकिक शिरूर तालुक्यात आणि जिल्ह्यात वाढतो आहे.त्यामुळेच माजी विद्यार्थी उद्योजक नवनाथ बबनराव थिटे यांचे देणगी मधून श्रीमती सिंधुबाई बबनराव थिटे भव्य सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन ( खर्च रू २६०००००) आणि विद्यालयात पूर्ण झालेल्या अनेक कामांचे उद्घघाटन त्यामध्ये केदूर गावचे भूषण नवी मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिपक कृष्णाजी साकोरे यांचे योगदानातून आणि संकल्पनेतून आपल्या संस्थेतील पाहिले लेफ्टनंट कृष्णाजी गेनुजी साकोरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (खर्च ७०००००रू.),शाळेचे माजी विद्यार्थी उद्योजक दशरथ ताठे यांचे देणगीतून सर्वात मोठा ८६ इंची स्मार्ट पॅनल बोर्ड (२४६६०० रू. ),शाळेचा माजी विद्यार्थी अमोल वसंत थिटे (सध्या अमेरिकेत )यांचे देणगीतून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुरक्षिततेसाठी एस. एस रेलिंग (खर्च रू १०००००),शाळेची माजी विद्यार्थी बॅच १९९८..९९यांचे देणगीतून शालेय व्यासपीठ एस. एस रेलिंग ( खर्च रू ५७०००),मा. दिपक साकोरे साहेब अतिरिक्त पोलिस आयुक्त नवी मुंबई यांचे योगदानामधून इनडोअर बॉक्सिंग गेम( खर्च रू. ३०००००),गावातील दशक्रिया मधील देणगी मधून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे साठी हॅन्डवॉश ( खर्च रू २५०००),वाघोलीचे उद्योजक श्री खंडू सातव यांचे देणगीतून विद्यालयाचे पूर्ण प्लबिंग,पाणी टाक्या सह( खर्च रू ८७५००),शाळेचे माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक यांचे देणगीतून सायकल बँक उपक्रम अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना २१ सायकली वाटप ( किंमत १०५०००),वाशी मार्केटचे प्रसिध्द दलाल सुनीलशेठ चौधरी साहेब यांचे देणगीतून ६६ इंची दोन स्मार्ट पॅनल बोर्ड ( किंमत रु २६००००)इत्यादी कामाची उद्घघाटने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर चे कार्याध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचे हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडले.याप्रसंगी आपल्या संस्थेचे सहसचिव प्रशासन पुणे विभाग प्रमुख एस.एम.गवळी , विद्यासमिती सचिव अरूण सुळगेकर,शाळेचे माजी विद्यार्थी नवनाथ बबनराव थिटे,माजी लेफ्टनंट कृष्णाजी गेनुजि साकोरे,वाशी मार्केट चे प्रसिध्द दलाल सुनील शेठ चौधरी, वाडिया महाविद्यालयचे माजी रजिस्टर विठ्ठल राहणे,माजी विद्यार्थी ओन.जी.सी.एलचे माजी अधिकारी शिवराम भोसुरे,उद्योजक खंडू सातव S.R.P.F आंतरराष्ट्रीय खेळ विजेते राहुल लिमन अधिकारी,संस्थेचे पुणे विभागीय सदस्य सदाशिव थिटे,राम साकोरे,नारायण फडतरे,गावचे सरपंच अमोल थिटे,मा.सरपंच सूर्यकांत थिटे,मा.उपसरपंच भरत साकोरे,उद्योजक सतीशदादा थिटे,शाळा व्यवस्थापनचे उपाध्यक्ष सतीश थिटे,वाजेवाडी गावचे मा. आदर्श सरपंच धर्मराज वाजे,पत्रकार श्रीहरी पऱ्हाड,पांडुरंग ताथवडे, तुकाराम सुक्रे,बाबुराव सकोरे , उद्योजक बन्सी पऱ्हाड,बाळासाहेब सुक्रे,मदन पऱ्हाड,भाऊसाहेब पऱ्हाड,वडगाव रासाई विद्यालयाचे प्राचार्य मदन दिवे,कोरेगाव भीमाचे प्राचार्य शरद आडूरकर तसेच अनेक पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी केदूर शाळा जे शहरात नाहीत असे शाळेतील अनेक उपक्रम,सुविधा याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ए. टी. साकोरे आणि समस्त ग्रामस्थ तसेच थोर देणगीदार,संस्थेचे हितचिंतक यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले. आणि भविष्यात या आपल्या संस्थेच्या केदूर शाळेत पुणे शहरातून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रवेश घेऊन आपल्या संस्थेतील एक मॉडेल आदर्श शाळा होईल असे गौरवउद्गागार काढले.कार्यक्रमचे प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे प्राचार्य ए. टी. साकोरे यांनी केले तरआभार राम साकोरे यांनी मानले.