प्रतिनिधी : सचिन थोरवे
तालुका जुन्नर. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीची कविता भेळ . ही कविता शिकता शिकता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वतः ओली भेळ बनवून त्याचा यथेच्छ आनंद घेतला.त्यानिमित्ताने इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी एका शेतकऱ्याची, तसेच एका भेळ विक्रेत्याची, व एका भाजी विक्रेत्याची तर मुलाखतही घेतली. प्रत्यक्ष त्यांना प्रश्न विचारून सर्व माहिती व्यवस्थित संकलित केली. अध्ययनबरोबरच प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती या विद्यार्थ्यांनी घेतली. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय बटवाल सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच उपशिक्षक श्री बनकर सर यांनी भेळ बनवण्याच्या साहित्याचे सर्व नियोजन केले. या आगळ्यावेगळ्या अध्ययन अनुभूतीची चर्चा गावात पालकांमध्ये समाधानकारक ऐकावयास मिळाली.