शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार
१५ ऑगस्ट२०२४ रोजी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल थेरगाव या शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी ठीक ६.४५ वाजता शालेय परिसरातून प्रभात फेरीचे नियोजन करण्यात आले नंतर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारत माताचे पूजन करण्यात आले.
प्रमुख अतिथी ,मान्यवर व इयत्ता दहावीला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आदिती खोसे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शारीरिक शिक्षिका संतोषी चौधरी यांनी राष्ट्रगीताची ऑर्डर दिली त्यानंतर ध्वजगीत, राज्यगीत ,संविधान घेण्यात आले. सर्व शिक्षक ,विद्यार्थी यांनी *राष्ट्र की जय* *चेतना का गान वंदे मातरम** ‘हे गीत प्रस्तुत केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मीना जाधव यांनी भारतीय इतिहास ,क्रांतिकारक, देशभक्ती स्वातंत्र्यलढा ,याची माहिती दिली. अंजली सुमंत यांनी, “गुंज रहा है दुनिया मे भारत का नगाडा चमक रहा आसमा मे देश का सितारा ” असे म्हणत सर्व सन्माननीय ,लोकसेवक सत्कारमूर्ती ,मान्यवरांचे परिचय व स्वागत केले.सर्व बालचमू ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर मराठी ,हिंदी इंग्रजी व संस्कृत मध्ये भाषण केले. बालवाडी विभाग- अक्षरा रणपिसे ,श्रीयांश लकडे ,सार्थक रणपिसे ,अनन्या राय ,अनन्या म्हस्के. प्राथमिक विभाग- गौरवी दरगुंडे वैष्णवी कांबळे ,गीता निर्बल ,राजवीर राऊत ,कोमल गोरे ,अनुज शिंदे ,शौर्य सर्वगोड. माध्यमिक विभाग- परिणीता नाळे ,नम्रता ओव्हाळ.प्रमुख मान्यवर नितीनजी अगरवाल यांनी आपल्या वक्तव्यातून तुमची शाळा नेता घडविण्याचे कार्य करत आहे सर्व काही संभव आहे असंभव असे जीवनात काही नाही असे मार्गदर्शन केले.मान्यवर नितीन बारणे यांनी दामोदर चापेकर व त्यांच्या आई संदर्भात आपले विचार व्यक्त केले दामोदर चापेकर जेव्हा फासावर चढले तेव्हा त्यांची शेवटची इच्छा होती माझ्या हातामध्ये टिळकांची गीता असावी त्यांच्या मातोश्री म्हटल्या मला फक्त तीन पुत्र आहे जर आणखी असते तर मी देशासाठी त्यांना दिले असते.लायन नंदिताताई देशपांडे यांनी सर्व शिक्षक चांगले माणूस व्हावे यासाठी प्रयत्न करतात .तुम्ही विविध उपक्रमात सहभागी व्हावे व तुमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात.कार्यक्रमाच्या अध्यक्षा निर्मलाताई खिंवसरा यांनी तुम्ही विद्यार्थी खूप हुशार आहात पण त्यासोबत तुमचे आरोग्य पण तितकेच महत्त्वाचे आहे . त्यांनी व्यायामाचे महत्त्व सांगितले व शाळेला देणगी स्वरूपात ५१ हजार रुपये ओपन जिम करण्यासाठी दिले.लायन मेंबर किरण वैद्य यांनी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा याचे प्रशस्तीपत्रक गीता निर्बल ,केतन सांगडे , सीयाेन सरवदे या विद्यार्थ्यांना दिले. प्रत्येक कला जोपासण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे मनोगत व्यक्त केले. सुनिता घोडे यांनी संकुलामध्ये घेण्यात येणारा उपक्रम १०० क्रांतिकारकांचा अभ्यास सर्वांसमोर जाहीर केला. हा उपक्रम स्वातंत्र्य दिनापासून ते प्रजासत्ताक अमृत महोत्सवी वर्षापर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली त्यांनी सरदार अजितसिंग संधू या क्रांतिकारकाची माहिती दिली. संकुलाचे रक्षक शिवाजी पोळ यांनी देशभक्तीपर गीत मेरे ‘देश प्रेमियो — सादर केले.
प्राथमिक विभागाच्या पल्लवी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतून मानवी हक्क व मूल्य ही छोटी नाटिका सादर केली. लियो मेंबर श्रावणी शाळीग्राम यांच्याकडून या नाटिकेला रोख बक्षीस १००० रुपये देण्यात आले.प्रशालेतील दोन विद्यार्थिनी सई लांडगे ,राधिका गोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्राथमिक विभागाच्या शिक्षिका विना तांबे यांनी त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आठशे विद्यार्थ्यांना खाऊ व संकुलासाठी आधुनिक स्वरूपाचे प्रिंटर व नेट पॅक उपलब्ध करून दिले आहे त्यांचाही सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी पृथ्वीराज वाल्हेकर यांनी गायनासाठी पेटीवादन करून शाळेला सहकार्य केले त्यासाठी त्याचा सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त संकुलाची विशेष नाविन्यपूर्ण बाब म्हणजे शाळेच्या सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका माधुरी कुलकर्णी यांनी क्रांतिकारकांचे व समाजसुधारकांचे ७५ फोटो शाळेला दिले ते हॉलमध्ये लावण्यात आले आहे. स्मिता जोशी यांनी विद्यार्थ्यांसमवेत सर्व धान्यापासून भारताचा आराखडा तयार केला हे दोन्ही आगळे वेगळे उपक्रम मुख्य आकर्षण ठरले.प्रमुख पाहुण्यांच्या समोर पंकज काळे या विद्यार्थ्याने भारत भूमीबद्दल वक्तव्य केले.भारताचा ७८वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात ,जल्लोषात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.कार्यक्रमाला माजी उपमहापौर झामाताई बारणे, दत्तात्रय कसाळे, सुरेश पाटील, सुनील जगताप ,मयूर वैद्य ,विनय देशपांडे केतकी कुलकर्णी ,मनोहर साळुंखे अभिजीत करवडे ,अनुजा करवडे मकरंद शाळीग्राम ,संगीता शाळीग्राम , भार्गवी शाळीग्राम विनायक केळकर ,प्रसाद दिवाण ,सारिका वैद्य ,श्रीधर टोकणेकर ,जयश्री टोकणेकर मान्यवर उपस्थित होते . माजी विद्यार्थी अनिकेत प्रभू ,मा.नितीन अगरवाल व प्राथमिक विभागातील पालक शरद शिर्के यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला.
ह्या सुंदर व भरगच्च कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वरी महाजन यांनी केले. आभार कृतिका कोराम यांनी मांडले या कार्यक्रमाला प्राथमिक विभाग प्रमुख नटराज जगताप माध्यमिक विभाग प्रमुख अश्विनी बाविस्कर बालविभाग प्रमुख आशा हुले व संकुलातील सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग व माजी विद्यार्थी उपस्थित होते.