प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने मंगळवार दि१३रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाने अनेक अन्यायकारक जीआर काढलेले आहेत.या अन्यायकारक जीआरमुळे राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्था ही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे हे जीआर तात्काळ रद्द होणे गरजेचे आहे. शालेय शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारात सुधारणा करण्याच्या मागणीस्तव महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जगताप अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शिक्षक सेना यांच्या सुचनेनुसार व रवींद्र वाघ आणि रामनाथ इथापे जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना पुणे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी कार्यालय,आयुक्त कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षण उपायुक्त जगदाळे साहेब यांना देण्यात आल.
या आंदोलनात शिक्षकांनी गगनभेदी घोषणा देऊन अवघा परिसर दणाणून सोडला राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी व शासन निर्णय २८ऑगस्ट २०१५ व १५ मार्च २०२४ संच मान्यतेची कायदा विरोधी शासन निर्णय तात्काळ रद्द करावे.
शाळा तिथे मुख्याध्यापक लिपिक आणि शिपाई यांची पदे कायम करण्यात यावीत.१०- २०- ३०ची आश्वासित प्रगती योजना तात्काळ सुरू करावी.विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना २०११च्या शासन परिपत्रकानुसार तात्काळ अनुदान घोषित करावे.शिपायांचा व शिक्षकांचा कंत्राटी पदभरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.भाषिक शाळांसाठी विशेष पॅकेज घोषित करण्यात यावे अल्पसंख्यांक संस्थांचे अधिकार अधिक्रमित करू नये.रात्र शाळांना विशेष दर्जा देऊन शिक्षकांना सेवेत घेऊन रिक्त जागेवर समायोजन करावे.अनुदानित शाळांची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय असल्याकारणाने त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान देण्यात यावे.पटसंखेचे कारण देऊन कुठलीही शाळा बंद करू नये.राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी शिक्षकांना गणवेशाची सक्ती करू नये शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची तात्काळ पद भरती करावी कला,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांना पूर्वीप्रमाणे संच मान्यतेत स्वतंत्र अस्तित्व असावे.
जिल्हा परिषद शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावी शासन निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया राबवावी समान काम समान वेतन वेतन या धर्तीवर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी लागू करावी.शिक्षक बांधवांना २४ वर्षे सेवा करून कोणताच लाभ होत नाही.शिक्षकांना २०टक्के पात्र न देता सरसकट निवड श्रेणी व वेतनश्रेणी लागू करावी आंतरजिल्हा बदली न गेलेल्या कर्मचारी यांना आगाऊ वेतन वाढ तात्काळ लागू करावी अशा मागण्या शिक्षक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने आज निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी मा.आयुक्त साहेब मा.शिक्षणाधिकारी साहेब यांना करण्यात आल्या.बोत्रे आर एस सरचिटणीस पुणे जिल्हा शिक्षक सेना.नीता गुंजीकर अध्यक्ष पुणे शहर प्राथमिक,अनिल दरेकर, प्रवीण ठोंबरे,नागेश तोरस्कर, शशिकांत लेंभे,कपिल देशमुख,महेंद्र न्याहकदे,दत्तात्रेय माळी,विजय महाजन,अर्चना भापकर,डावखरे, कोल्हे,गीता पवार,डामसे,शिरसाठ मुख्याध्यापक नवनाथ कावरे,शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे कार्याध्यक्ष रवींद्र गावडे उपस्थित होते या आंदोलनात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.