जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतुर पोलीस स्टेशन हद्दित वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केले बाबत,लोकसेवकाने जारी केले आदेशाचे उल्लंघन केले बाबत तसेच सार्वजनिक ठिकाणी शांतता बिघडवलेबाबत दाखल असलेल्या गुन्हयांतील आरोपीतांवर शनिवार दि:- २७ जुलै रोजी श्रीमती नम्रता बिरादार, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो.,जुन्नर न्यायालय येथे आयोजीत लोकअदालत मध्ये खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे यांनी दिली. १) सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक रित्या वाहन उभे करून रहदारीस अडथळा अगर व्यक्तीला धोका निर्माण होईल असे कृत्य केले असलेबाबत भा.दं.वि.क. २८३ प्रमाणे दाखल एकुण १५ केसेस शाबीत झाल्या असून त्यातील एकूण १५ आरोपींवर प्रत्येकी २०० रूपये प्रमाणे एकूण ३,००० /- रू. दंडाची कारवाई करणेत आली आहे.२) मादक पदार्थाचे सेवन करून,वाहन चालवताना मिळून आले असलेबाबत मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे दाखल एकुण २ केसेस शाबीत झाल्या असुन त्यातील ०२ आरोपींवर एकुण प्रत्येकी १०,०००/- प्रमाणे एकूण २०,०००/- रू. दंडाची कारवाई करणेत आली आहे.३) लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले असलेबाबत भा.दं.वि.क. १८८ प्रमाणे दाखल १ गुन्हा शाबीत झाला असुन ८०० /- रू. दंड प्रमाणे कारवाई करणेत आली.४) सार्वजनिक ठिकाणी जमावाने दंगल करून,शांतता बिघडवले बाबत भा. द.वि.क.१६० प्रमाणे दाखल १ गुन्हा शाबीत झाला असून त्यातील दोन आरोपींवर प्रत्येकी २००/- रू.प्रमाणे एकूण रु. ४००/- दंडाची कारवाई करणेत आली आहे.
याप्रमाणे एकुण १९ केसेस शाबीत झाल्या असुन एकुण २४,२०० /- रू. दंडात्मक कारवाई करणेत आली आहे.या सर्व केसेसमध्ये कोर्ट कारकून म्हणून पोलीस कॉन्स्टेबल अतुल भेेके यांनी कामकाज पाहिले. वरील सर्व केसेस चे कामकाज स.पो. नि.लहू थाटे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार सुरेश गेंगजे,नामदेव बांबळे,बाळशिराम भवारी,महेश पठारे,महिला पोलीस हवालदार भारती भवारी,पोलीस नाईक भरत सूर्यवंशी,पोलीस कॉन्स्टेबल श्याम जायभाये,संदीप भोते यांनी काम पाहिले तर संबंधित सर्व केसेसमध्ये समन्स बजावणीचे काम पोलीस नाईक जनार्दन सापटे यांनी केले.