प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
डॉ बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणेचे अध्यक्ष भीमराव धिवार यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील गुरुजनांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कस्तुरी हॉल पुणे सोलापूर हायवे उरुळी कांचन या ठिकाणी रविवार दि. २१ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.

पुणे जिल्हा परिषद पुणेचे विषयतज्ज्ञ प्रदीप रामचंद्र देवकाते,पंचायत समिती दौंड शिक्षण विभागाच्या गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ दत्तात्रय कुंडलिक कुदळे,सोमनाथ तुकाराम बंड या शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.रवींद्र चव्हाण मा. संचालक यशदा व बार्टी महाराष्ट्र शासन,तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. राहुल मोरे उपयुक्त महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन उपस्थित होते.शिक्षण क्षेत्रामध्ये,उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुरुजनांचा दरवर्षी राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने कार्यकारी समिती त्यांना प्रेरणा देण्यासाठी सत्कार करून सन्मानित करत असल्याचे अध्यक्ष धिवार यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणेचे कार्याध्यक्ष विजय शिंदे,सचिव रा.वि.शिशुपाल,सहसचिव विजय रोकडे व समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.