जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ब्रह्मनाथ विद्यामंदिर पारुंडे येथील तब्बल पंचवीस वर्षापूर्वीच्या सन १९९९-२००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता.प्रथमता गुरु पूजन कार्यक्रम रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी जुन्नर येथील महालक्ष्मी लॉन्स मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पंचवीस वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आल्याने शाळेतील जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो ? या प्रश्नांपेक्षा आम्ही सर्व काय करतो याची उत्सुकता सर्वांना होती.या स्नेह मेळाव्यासाठी सर्व गुरुजनांना,शिक्षक वृंदाना खास आमंत्रण देण्यात आले.या कार्यक्रमासाठी ब्रहमनाथ विद्यामंदिर पारुंडे येथील शिक्षकांनी हजेरी लावली.एकूण ६० विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार व अर्चना लामखडे यांनी उत्तम रीत्या केले. नंदाराम टेकवडे यांनी मनोगत व्यक्त केले . तसेच डॉ फकिर आतार, तुळशीराम ससाणे,भगवान जुन्नरकर,व्हि.जी.पवार,दत्तात्रय आरकडे,मंदाकिनी पवार,मंगल तांबे,उज्वला पटेकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सारिका नलावडे,सीमा चव्हाण, अश्विनी डफळ यांनी स्वागत गीत सादर करून वातावरण प्रसन्न केले.ललिता नायकोडी यांनी सुंदर रांगोळी काढली.सर्व विद्यार्थ्यांनी आपली व्यक्तिगत माहिती सांगून एकमेकांशी सुसंवाद साधला.शेवटी विजय पवार यांनी आभार प्रदर्शन केले.त्यानंतर शिक्षकांमधून कैलास दाभाडे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर स्नेहमेळावा आयोजित केला म्हणून माजी विद्यार्थ्याचे आभार मानले. पर्यावरण जागृतीचा संदेश देत प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांना फळझाडांची रोपे वाटण्यात आली शेवटी वंदेमातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button