जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
रविवार दिनांक २१ जुलै २०२४ रोजी ओतूर, ता:-जुन्नर, जि:- पुणे येथील कवठे यमाई मंदिराच्या सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यावेळी १३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले.रुग्णांना तपासणी,मोतिबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास,निवास,जेवण,चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. गेल्या सहा महिन्यात डिसेंट फाउंडेशन,शंकरा हॉस्पिटल पनवेल,विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून १६७२ नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशन ने केला असून, त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ आम्हाला सहकार्य करत आहेत.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,शंकरा आय हॉस्पिटल चे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील,जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतुरकर,विलास सुतार,रा.ज्ञा. डुंबरे,दत्तात्रय डुंबरे,दिलीप घोलप, शंकर भिसे,जय बजरंग सेवा गणेश मंडळाचे धोंडीभाऊ मोरे, लक्ष्मण डुंबरे,संभाजी गायकर, बापूसाहेब ठोंबरे,राजेंद्र थोरात, विठ्ठल शितोळे,दिलीप तांबे, गोविंद माळवे,विठ्ठल डुंबरे, कैलास डुंबरे,सुदाम घोलप, श्रीराम डुंबरे,संजय तांबे,जयसिंग ढमाले,योगेश वाघचौरे आदी मान्यवर, नेत्र रुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.