जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाल्याची माहिती मुख्याध्यापक प्रतीक अकोलकर यांनी दिली.
स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत लोहोटे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना आजच्या विज्ञान युगात मनुष्याने कितीही प्रगती केली तरी गुरूंचे महत्त्व कधीही कमी होणार नाही ‘गुरु हा ज्ञानाचा सूर्य शांतीचा हिमालय आणि प्रेमाचा महासागर आहे’ अशा भावना व्यक्त करून सर्व गुरुजनांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुष्पावती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम.एन.पुरी उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचा सत्कार करून गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी स्वरा उकिरडे,पायल मंडलिक, जियान मणियार,स्वरा सोमवंशी, सिद्धी लोहोटे,परी भिसे,स्वराली आमले,श्रेयसी पडवळ,वेदिका लोहोटे इत्यादी विद्यार्थ्यांनी गुरुजनांविषयी आपला आदरभाव व्यक्त केला
विठ्ठल शितोळे,जगन्नाथ गाढवे यांनी जीवनातील गुरूं विषयीचे महत्व विशद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश कोंडार,निवेदन दत्तात्रय घोलप तर आभार विठ्ठल डुंबरे यांनी मानले.