प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा ता. शिरुर जि.पुणे या विद्यालयामध्ये आषाढीवारी पंढरपूर यात्रे निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून विठ्ठल-रुख्मिणी व वारकरी,विणेकरी या वेशभुषेसह टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीतून गावात पालखी मिरवणूक घेऊन भक्तीमय वातावरणात ग्रामस्थांनी सहभाग घेत पालखी सोहळ्यांत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात गोल रिंगण करुन अभंग,ओवी,भारुड गिते,साक्षरता,व्यसनमुक्तीवर गिते गात पालखी सोहळ्याचा आनंद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी घेतला.भैरवनाथ विद्यालयाने आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यांत आलेगाव पागा मधील सर्व प्राथमिक शाळा त्यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा आलेगाव,भैरवनाथ नगर,बेनकेनगर ,कोल्हाटेनगर, भोसलेनगर,खंडोबानगर, चौधरीनगर,गुंजाळवस्ती या प्राथमिक शाळांनी पालखी सोहळ्यांत सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली.
पालखीचे पुजन विद्यालयाचे प्राचार्य तथा शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील म्हाळसकर,राजेंद्र काळे,रमेश जांभळकर,सुंदरा बिडगर,नंदा गांधले,छाया गुंड,माया आव्हाड, बाबाजी निचीत,ललिता देवरे इ.प्राथमिक शिक्षकांसह मा.उपसरपंच रामदास वाघचौरे,पोपटकाका वाघचौरे उपप्राचार्य संभाजी कुटे,दिलीप वाळके, संतोष हिंगे, अंबादास गावडे, ज्योती गजरे,सत्यश्री दिवटे,सुप्रिया काळभोर,सतीश अवचिते, नितीन गरूड, देवीदास कंठाळे,शरद शेलार, मच्छिंद्र बेनके, बाबुराव मगर, लक्ष्मण हरिहर इ.कर्मचारी उपस्थिती होते.पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी आनंदगड वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.