जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने संत निरंकारी सत्संग भवन,काळेवाडी येथे रविवार दि.७ रोजी पुणे झोन चा बाल संत समागम सकाळी ११ ते २ या वेळेत संपन्न झाला.या सत्संग समारोहाला २८०० हुन अधिक ३ ते १५ वयोगटातील बाल संत तसेच त्यांचे पालक पुणे जिल्ह्यातील विविध भागातून उपस्थित होते.या बाल समागमाचे विशेष आकर्षण ठरले ती ‘कोण बनेल गुरुशिख’ या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा.या प्रश्नमंजुषेचा मुख्य आधार संत निरंकारी मिशन चा इतिहास आणि निरंकारी सद्गुरूंची शिकवण होता. गीत,विचार,अभंगाच्या माध्यमातून लहान-लहान बालकांनी सदभावना,विशालता,समर्पण,मर्यादा, शुकराना,विनम्रता,सहनशीलता अशा अनेक दैवी गुणांची चर्चा केली व सद्गुरूंचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला.मुलांनी सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमातून लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही निरंकारी मिशनची तत्वे,गुरुमत आणि भक्तीच्या वाटेवर चालण्याची शिकवण प्राप्त होत होती.
या बाल समागम चा उद्देश हा होता कि लहान मुलांमध्ये कमी वयापासूनच स्वतःचे जीवन कसे बनवावे,एक सुजाण नागरिक म्हणून आपण जीवन कसे जगावे,मानवी मूल्ये आपला जीवनात कशी आत्मसात करावी याचा संदेश या समागमामधून मुलांना मिळत असतो. लहान वयात मुलांनादेखील योग्य संस्कार मिळाले तर ती देखील समाजासाठी पोषक बनू शकतात अन्यता संस्काराभावी समाजाला घातक प्रवृत्ती तयार होताना दिसतात असे उद्गार मुख्य मंचावरून समजावताना सचिन रजक यांनी काढले.समाजामध्ये कसे वागावे,कसे राहावे,कसे बोलावे या सर्व गोष्टीचे शिक्षण बालसत्संगच्या द्वारे मुलांना दिले जाते.मिशनच्या आजवर झालेल्या सर्व सद्गुरूंनी आपल्या बाल्यावस्थेतच मिशनची शिकवण आपल्या आचरणातून प्रगट केली. यावेळी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी सदगुरु माताजींकडे आशीर्वादाची कामना केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्यांश पोळ व तनिष्का तुपदार या बालकांनी केले.