प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
जि प शाळा शिक्रापूरची विद्यार्थिनी उत्कर्षा दानवे २९० गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आली असून शाळेचे १२ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत तर ४४ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले जि.प.शाळा शिक्रापूरने निकालाची परंपरा कायम राखली.उत्कर्षा ही प्रा.विनोद दानवे यांची कन्या असून दानवे हे सर परशुरामभाऊ महाविद्यालय टिळक रोड पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत.
उत्कर्षाने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेतली तिला संजय थिटे सर,पुंडे सर,नानेकर सर,मोरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,माध्यमिक शिक्षक संघटनेचे सोमनाथराव भंडारे,मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य प्राचार्य अनिल साकोरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे,शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा प्रा.निर्मला संकपाळ,पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या उपाध्यक्षा प्रा.रत्नप्रभा देशमुख,शिरूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संतोष क्षीरसागर यांनी उत्कर्षाचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.