प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान केंदूरचे काम कौतुकास्पद असल्याचे मत श्री पद्ममणी जैन कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय घोडेकर यांनी सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदुर येथे माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या वतीने शिष्यवृत्ती वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व विद्यार्थ्यांना डिजिटल,स्लेट वाटप कार्यक्रमाच्या निमित मांडले.
कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्राचार्य अनिल साकोरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे,ग्लोब इन्फोटेकचे दत्तात्रेय गुंजाळ,शिवाजीराव ताथवडे उपस्थित होते.
डॉ.घोडेकर पुढे म्हणाले की शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील पाया घडवणारी परीक्षा असून यातूनच लहान वयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय लागते व त्यातूनच भविष्यात उच्चपदस्थ अधिकारी तयार होण्यास मदत होते.प्राचार्य अनिल साकोरे यांनी माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान केंदूरच्या अध्यक्षा जिजाबाई थिटे,उपाध्यक्ष सविता थिटे,सचिव कमलावती थिटे तसेच खजिनदार तानाजीराव थिटे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात करत असलेल्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गावडे,चंद्रकांत थिटे यांनी तर आभार पर्यवेक्षक एम.पी. पाटील यांनी मानले.