प्रतिनिधी : सचिन थोरवे
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत धनगरवाडी येथे काही इसम गावठी हातभट्टीची दारू चोरून विकत असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना समजली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आज दिनांक 3 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता चे सुमारास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, महिला पोलीस शिपाई शुभांगी दरवडे, पोलीस शिपाई गोरक्ष हासे यांनी गोपनीय माहितीच्या अनुषंगाने धनगरवाडी येथे रवाना होऊन महिला नामे अनिता विजय मारवाडी वय 46 वर्ष राहणार धनगरवाडी तालुका जुन्नर यांचे घराजवळ जाऊन खात्री केले असता त्या त्यांचे पत्र्याच्या घराशेजारील भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विकत असताना दिसून आल्या.. पोलिसांनी सदर ठिकाणावरून 8,200/- रुपये किमतीची एकूण 82 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून सदर बाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे हे करीत आहेत..
सदरची कारवाई मा. श्री पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री रमेश चोपडे सो, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री रवींद्र चौधर, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर, मा. श्री अविनाश शिळीमकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री महादेव शेलार सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव पोलीस स्टेशन, सनील धनवे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आमदार संतोष कोकणे, पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे, पोलीस शिपाई दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, गोरख केंद्रे, महिला पोलीस शिपाई शुभांगी दरवाडे यांचे पथकाने केले आहे