शुभम वाकचौरे
शिरूर शहरातील मंगलमूर्ती नगर, मदारी वस्ती आणि डोमे वस्ती येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून नगरपरिषदेने रस्ताच दिला नाही..!
अनेक वेळा त्या ठिकाणी अपघात झाले, पावसाळ्यात पाणी साचल्याने अनेक जण घसरून पडलेत,
मदारी वस्ती येथील रस्ता म्हणजे नदी आणि दशक्रियाविधी घाटा कडे जाण्यासाठी महत्वाचा रस्ता तरीही नगरपरिषद त्याठिकाणी दुर्लक्ष करत आहे.
डोमे वस्ती येथील नागरिकांना तर रस्ताच नाही, काही खाजगी जागा मालकांनी त्यांची वहिवाटच बंद केली आहे, त्याठिकाणी नगरपरिषदेच्या डिपी नुसार 18 मीटर चा रस्ता आरक्षित आहे तरीही नगरपरिषद रस्ता तयार करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.
अश्या अनेक तक्रारी बहुजन मुक्ती पार्टी कडे आल्या आहेत त्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.फिरोजभाई सय्यद व भारतीय बहुजन पालक संघाचे राज्य संयोजक मा.नाथाभाऊ पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली,शहराध्यक्ष समाधान भाऊ लोंढे, शहर सचिव सागर दादा घोलप, शहर संघटक अशोक भाऊ गुळादे यांनी स्थानिक पुरुष व महिलांना बरोबर घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांना निवेदन दिले आहे.
शिरूर नगरपरिषदेने जवळपास शंभर कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला आहे असे दाखवते मग तो निधी नेमका कुठे खर्च झाला असा प्रश्न मंगलमूर्ती नगर, मदारी वस्ती आणि डोमे वस्ती येथील नागरिकांना पडला आहे.
नगरपरिषद निधी खर्च करताना दुजाभाव करते का..? ज्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे त्याच ठिकाणी निधी उपलब्ध नसतो हा काय प्रकार आहे असा सवाल बहुजन मुक्ती पार्टी आणि नागरिकांनी विचारले आहे.
तसेच वाडा कॉलनी येथील नागरिकांना पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अपुरी असल्याने नागरिकांना नळजोडणी करण्यासाठी अनेक समस्यांना आणि आर्थिक भुर्दंडाला तोंड द्यावे लागत आहे.
यामुळे बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने
दिनांक=15/07/2023 रोजी शिरूर शहरातील संविधान चौकात मुख्य रहदारीच्या ठिकाणी शिरूर नगरपरिषदेच्या विरोधात मोठा फ्लेक्स बोर्ड लावून नागरिकांच्या स्वाक्षरी मोहीम राबविण्यासाठी परवानगी द्यावी अश्या आशयाचे निवेदन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांना दिले आहे.
मुख्याधिकारी या निवेदनाची दखल घेऊन काय कार्यवाही करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.