शिरूर प्रतिनिधी :शकील मनियार
- मानव अधिकार फाउंडेशन, भारत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी कार्यशाळा बारामती येथील वानेवाडी येथे दि.३०जून रोजी संपन्न झाली. या कार्यक्रमात शिक्रापूर येथील आदर्श समाजसेवक, माहिती अधिकार कार्यकर्ते, कवी, लेखक श्री. संतोष दशरथ काळे पाटील यांची नि:स्पृह सामाजिक सेवेची दखल घेऊन मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हाध्यक्ष सामाजिक व न्याय संरक्षण पदी माननीय श्री प्रमोद ज्ञानेश्वर फुलसुंदर राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच सुनील मुरलीधर शिंदे उपाध्यक्ष सामाजिक न्याय संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र देत निवड करण्यात आली.यावेळी बारामती मानवाधिकार फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील सर्व मानवी उत्पीडित घटकांना मानवाधिकार फाउंडेशनच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष फुलसुंदर साहेब तसेच राज्य उपाध्यक्ष शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मानवाधिकार फाउंडेशन भारत अंतर्गत काम करणार असल्याचे संतोष काळे पाटील यांनी नियुक्तीनंतर सांगितले.