जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र राज्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील घाटांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि पर्यटकांचे वर्षाविहारासाठी अत्यंत लोकप्रिय व आवडते ठिकाण म्हणजे जुन्नर तालुका व मुरबाड तालुका मार्गे मुंबईला जोडणारा घाट म्हणजे प्रसिद्ध माळशेज घाट याशिवाय महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेले हा घाट यंदा जून महिना संपत आला तरी कोरडा होता मात्र ३० जून रोजी या घाटाने पहिला मौसमी पावसाचे दर्शन झाले. हा पाऊस धिम्या गतीने जरी असला तरी उपस्थित पर्यटकांना आनंदित केले आणि सर्वात जास्त आनंद कोणाला झाला तर या घाटात छोटे मोठे व्यवसायिकांना झाला असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.
रविवारी सुट्टी असल्याने नेहमी प्रमाणे वर्षाविहार करण्यासाठी हजारो पर्यटकांनी माळशेज घाटात गर्दी केली होती सकाळपासून वरून राजाने माळशेज घाट परीसरात धिम्या गतीने का होईना पण हजेरी लावली,त्यामुळे सर्व टपरी चालक आणि आलेल्या पर्याटकांच्या चेहर्यावर काहीशा प्रमाणात आनंद पाहायला मिळाला आहे,त्यात टोकावडे पोलिस ठाण्याचे श्री चकोर साहेब यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्तात पोलिस व्हॅन दिवसभर फिरत होती,ज्या हुल्लडबाजी करणार्या पर्याटकांनी नियमांचे उल्लंघन करून गाडी रस्त्यावर उभी करताना आढळले त्याच्यावर दंड आकारला,त्यामुळे सर्वानीच आप आपली वाहने पार्किंगमध्येच उभी करावी हि सुचना देण्यात आली :––:माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य पाहण्यास येणाऱ्यांना विनंती करत आहे,कि हसा खेळा पण शिस्त पाळा असे आवाहन टपरी चालक मालक अध्यक्ष या नात्याने सर्वांस करतो, प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून पर्याटनांचा आनंद घ्यावा,कदाचित तुम्हाला कुटुंबाची गरच नसेल पण कुटुंबाला तुमची गरच आहे हे विसरू नका सुभाष जगताप, (अध्यक्ष टपरी चालक मालक अशोशियण संघटना करंजाळे माळशेज घाट रजि) बाळूशेट साबळे (निसर्ग प्रेमी) अंकुश भोईर