जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापूर ता. जुन्नर येथे गेली दोन महिन्यांपासून डेंग्यू, टायफॉईड,हिवताप आणि इतर आजारांनी नागरिकांना ग्रासले असून यामध्ये काही नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला असल्याने उदापुर ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय अलर्ट मोडवर आले असून गेली दोन दिवसांपासून गावठाणात शनिवारी सायंकाळी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली डेंगी आणि इतर आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाकडून औषध धुरळणी करण्यात आली असून प्रत्येक घरात घुसून धुराळा केला आहे याशिवाय जिल्हा परिषद केंद्रशाळा,अंगणवाडया, त्याचबरोबर सरस्वती विद्यालयाच्या इमारती देखील आतून धुराळणी करण्यात आली आहे. उदापूर मध्ये डेंगी,टाइफाईड,थंडी,ताप,सर्दी खोकला या आजाराचे रूग्ण वाढल्यामुळे जुन्नर तालुका आरोग्य विभाग,ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली उदापूर ग्रामपंचायतीकडून गावात आणि घरांमध्ये डास प्रतिबंधक औषधधुरळणी करण्यात सुरुवात झाली आहे सदर औषध धुरळणी कशी करावी याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते यांनी उदापूर येथे औषध धुरळणी सुरू असताना भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या.याशिवायउदापुर गावठाण अंतर्गत वाड्यावस्त्यांवर देखील अशा प्रकारच्या धुराळणी करण्यात याव्यात अशी मागणी वाद्यावंस्त्यांवरील ग्रामस्थांनी केली आहे. धुरळणीवेळी सरपंच सचिन आंबडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुलवडे,विनोद भोर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गणेश शिंदे,सखाराम भले,भूषण वैद्य,आरोग्य निरीक्षक कैलास बोऱ्हाडे,अर्जुन बडे, अभिजित ढेकणे,सुनील साळुंके, आशावर्कर पूजा घोडेकर,निशा सोनवणे उपस्थित होते. तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीहरी सारोक्ते म्हणाले,”सध्या वातावरणातील बदलामुळे मच्छरांची पैदास वाढत आहे.थंडी,तापाचे रूग्ण ही उपचार घेताना दिसून येतात.त्यामुळे घरच्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच घरामध्ये मच्छर प्रतिबंधक अगरबत्ती वापरावी.तसेच बोगस व्यक्तींकडे उपचार न घेता ताप,थंडी आल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.जास्ती जास्त पाणी प्यावे आणि ताजे अन्न खावे.”.