जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या सर्व शाखेंच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन अतिशय उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर स्वागत समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अवघडे सर,उपप्राचार्य डॉ. के डी सोनवणे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.लंगडे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बनसोडे अमृत तसेच कनिष्ठ विभागाचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगून नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच अनेक शिक्षकांनी देखील आपली मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अवघडे सर यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभाग,सोयी सुविधा यांची माहिती देण्यात आली व प्रत्यक्ष भेट देण्यात आली.अशाप्रकारे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातील पहिला दिवस अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला .सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली व सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.