जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात मार्च २०२४ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पंतप्रधान यांचे सुरक्षा पथकातील कमांडो राम शिंदे, बॉर्डरलेस पँथर्स चे संस्थापक दीपक सुकाळे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे,राजेंद्र डुंबरे,खजिनदार रघुनाथ तांबे,सचिव प्रदीप गाढवे,सहसचिव पंकज घोलप,आत्माराम गाढवे,सर्जेराव गाढवे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती भिमसिंग डुंबरे,माजी मुख्याध्यापक छबुराव थोरात,ज्ञानेश्वर पानसरे, संजय हिरे, शांताराम पानसरे,प्रकाश डुंबरे,संजय वल्हवणकर,नितीन तांबे,अशोक अहिनवे,शांताराम वाकर,महेंद्र पानसरे,सचिन तांबे,शिवाजी फलके,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या ३७ विद्यार्थ्यांना मानाचे मेडल,गुलाब पुष्प व पेढा भरवून पालकांसह गौरवले गेले.यावेळी राम शिंदे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी आतापासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे.सीमारेषेवर भारतीय जवान ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता लढत आहेत.अगदी तसेच सहनशील राहत आपण यशाला गवसणी घातली पाहिजे.”बालरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र फलके म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी दहावीला मिळवलेल्या मार्कांवर अवलंबून न राहता भावी काळामध्ये प्रत्येक विषयाच्या कन्सेप्ट समजावून घेऊन अभ्यास केला पाहिजे. प्रचंड स्पर्धा आहे.या गोष्टीचे भान ठेवून, आपली क्षमता,आपली आर्थिक परिस्थिती,आपली आवड लक्षात घेऊनच करिअर निवडावे.
“सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने यावर्षी जुन्नर तालुक्यात प्रथम आलेला सार्थक मंगेश तांबे याने आपले मनोगत व्यक्त केले.या समारंभाच्या निमित्ताने इंदुमतीभिमसिंग डुंबरे,विमल सुरेश डुंबरे, जयश्री जीवन डुंबरे यांनी रोख १४ हजार रुपयांची बक्षिसे विद्यार्थ्यांना दिली. तसेच ”विघ्नहर’ चे माजी संचालक आत्माराम गाढवे, शांताराम वाकर यांनी सुद्धा प्रत्येकी दोन हजार रुपयांची बक्षीसे विद्यार्थ्यांना दिली.माजीमुख्याध्यापक छबुराव थोरात यांनी सर्व विद्यार्थी पालक वर्गाचे पेढा भरवून तोंड गोड केले.मंगेश तांबे,दिलीप मोरे,डॉ. सविता फलके,शरद वारुळे,अजित तांबे, अश्पाक शेख,भरत इसकांडे,वैष्णवी लंबे,सुनील यादव,रवींद्र शिंगोटे,संपत ढमाले,उत्तम थोरात,बापूराव आस्वार, निलेश डुंबरे, मंगेश खेत्री, संतोष वीर, उमाजी डुंबरे , आमोद लांडगेआदि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक अनिलउकिरडे यांनी तर भाऊसाहेब खाडे यांनी सूत्रसंचालन केले. अजित डांगे यांनी आभार मानले.शरद माळवे,संतोष कांबळे,विशाल चौधरी, अनिल जवरे,राजाराम शिंदे, अमित झरेकर,५देवचंद नेहे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.