जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक गावच्या उपसरपंच वैशाली थोरवे या अनेक वर्षापासून गावातील अनेक बचत गटांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन करत असतात.
नारी शक्ती सामाजिक महिला संस्था ही संपूर्ण महाराष्ट्रभर महिलांसाठी काम करीत असून या संस्थेमध्ये 18- 6 -2024 ते 18 -6 -2025 या सालाकरिता वैशाली ताई थोरवे यांना नाम मात्र सभासद करून त्यांना 18- 6 -2024 ते 18- 6 2-025 सालाकरता थोरवे यांची महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल भापकर आणि सचिव सौ हेमलता दत्तात्रय निंबाळकर नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य यांनी शिरोली गावच्या विद्यमान उपसरपंच वैशाली थोरवे यांना दिले .
संस्थेने नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये महिलांसाठी काम करण्यासाठी यांची निवड करण्यात आली आहे तसेच त्यांचीही काम करण्याची इच्छा असल्याची खात्री झाल्यामुळेच संस्थेने त्यांची प्रदेशाध्यक्ष या पदावर निवड केली आहे वैशालीताई थोरवे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्यासह गावातील ग्रामपंचायत शिरोली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .