जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र शासनातर्फे दि:-१५ जून २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वनमहोत्सव व “अमृत वृक्ष आपल्या दारी” ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत वनविभागामार्फत अल्पदरात वृक्ष लागवडीसाठी रोपे विक्री व रोपे वाटप केले जाते. ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत शासकीय रोपवाटिका उदापूर येथे १ लाख रोपे निर्मिती करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण ४८ वन प्रजातींचे रोपे निर्मिती करण्यात आलेली आहे.यामध्ये बांबू, कवठ जांभूळ, वावळा, उंबर, पिंपळ, वड, आपटा, बहावा, अंजन, शिसू, अर्जुन, चिंच, सीताफळ, करंज इ. रोपे निर्मिती करण्यात आलेली आहे. वनमहोत्सव कालावधी मध्ये शासकीय संस्थांना, शाळा व महाविद्यालयांना, पोलीस व लष्करी दलांना मागणीपत्रानुसार मोफत रोपे वाटप केले जाते. यासोबतच रोपे विक्री अत्यल्प दराने केली जात आहे. तरी जुन्नर तालुक्यातील सर्व संस्था, महाविद्यालय तसेच नागरिकांनी वनमहोत्सव कालावधीत शासकीय रोपवाटिका उदापूर येथून रोपे घेऊन २०२४ च्या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचे आवाहन वैभव काकडे वनपरिक्षेत्र अधिकारी,ओतूर यांच्याकडून करण्यात येत आहे.रोपे मिळवण्यासाठी संपर्क : एस.ए. राठोड, वनरक्षक उदापूर.