जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
विठ्ठलवाडी ता:-जुन्नर येथील कृषि। विभागात कार्यरत असणारे कृषी अधिकारी व ज्यांना सेवा निवृत्तीला काही महिने बाकी असताना चार हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बापू एकनाथ रोकडे असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून संपूर्ण कृषी अधिकारी
कर्मचारी आणि शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे.ट्रॅक्टर अनुदानाची रक्कम काढून देण्यासाठी लाच स्वीकारताना जुन्नर येथील कृषी अधिकाऱ्यास गुरुवार दि:- ६ जून रोजी रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील एका शेतकऱ्याने तक्रार केली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,येणेरे येथील तक्रारदार यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर झाला होता.हे शासकीय अनुदान मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता
त्यांनी केली होती.
या ट्रॅक्टरचे मंजूर शासकीय अनुदान मिळण्यासाठीतक्रारदार यांनी कृषी अधिकारी बापू रोकडे यांची भेट घेऊन अनुदानित रक्कम संदर्भात चर्चा केली होती.
त्या वेळी बापू रोकडे याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली.तडजोड होऊन चार हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून कार्यालय परिसरात चार हजार रुपये लाच स्वीकारताना बापू रोकडे याला रंगेहाथ पकडले.बापू रोकडे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.