जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील धोलवड येथील पूजा अमोल काळे यांनी यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर या संपूर्ण २५० किलोमीटरच्या पालखी मार्गावर रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्याचा संकल्प जाहीर केला आहे.यासाठी एकूण अडीच टन रांगोळीचा वापर करण्यात येणार असून एकूण तीन जणांची टिम या उपक्रमात सहभागी असणार आहे.
धोलवड येथील पूजा अमोल काळे या अतिशय गरीब घरातील गृहिणीने हा आगळावेगळा वारीचा संकल्प जाहीर केला आहे.श्रीक्षेत्र देहू येथून दिनांक २८ जून रोजी पालखीचे प्रस्थान होणार आहे. श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर हा सतरा अठरा दिवसांचा पालखी सोहळा विठू नामाचा गजर करत मार्गक्रमण करत असताना संपूर्ण पालखी मार्गावर रांगोळी काढून पालखीचे स्वागत करण्याचा संकल्प करणाऱ्या पूजा अमोल काळे यांचा कलेच्या माध्यमातून आगळीवेगळी वारी करण्याचा मानस आहे.
यासाठी जवळपास एक लाख रूपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी भाविकांना मदतीचे आवाहन करण्यात येत असून भाविकांनी सढळ हस्ते मदत करून या आगळ्यावेगळ्या वारीत सहभागी व्हावे. यासाठी मदत 9960552904 या मोबाइल नंबरवर किंवा खालील बॅंक खात्यावर जमा करावी. कृपया हा संकल्प पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे.अमोल सिताराम काळे,बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा:- ओतूर A/C no. 60045602371IFSCode MAHB0000130.