प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
सेकंडरी स्कूल एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेची नुकतीच दि.२२मे ते ३१ मे २०२४अशी दहा दिवसांची कौटुंबिक सहल दिल्ली, जम्मू काश्मीर,श्रीनगर,पहेलगाम, गुलमर्ग,सोनमर्ग इ.ठिकाणी भेट देऊन सहलीचा आनंद घेतला
संस्थेच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करीत सभासद बंधू भगिनींना देशांतर्गत कौटुंबिक सहल व्हावी यासाठी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन हॉलिडे लिंक या कंपनीशी बोलनी करून अल्प दरात स्वतः पन्नास कुटूंबासह १२५ पर्यटकांनी सहलीसाठी घेऊन गेले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांच्या मागणीनुसार ही देशांतर्गत पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती सभासदांच्या हितासाठी संस्था नेहमी वेगवेगळ्या योजना राबवत असते मेडिक्लेम योजनेत उत्स्फूर्त प्रतिसादानंतर पर्यटन योजना सुद्धा यशस्वीपणे राबविण्यात आली सहल यशस्वी होण्यासाठी हॉलिडे लिंकचे व्यवस्थापक राकेश मोरे ,मनोज पटेल,उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे खजिनदार सतेश शिंदे तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, संचालक सचिन नलावडे गोविंदराव सूळ ,तुकाराम बेनके इ.संचालकांनी सहलीत सहभाग घेऊन सहल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतलेला पर्यटन हा विषय यशस्वी झाला यापुढेही ही पर्यटन सेवा सुविधा अशीच चालू राहील अशी ग्वाही अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सभासदांना दिली.