जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे
शिरोली बुद्रुक या ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक हे विद्यालय आहे विद्यालयामध्ये इयत्ता दहावी मध्ये 112 विद्यार्थी हे एसएससी बोर्ड परीक्षेला बसले होते . हे सर्व विद्यार्थी पास झाले झाल्यामुळे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती विद्यालयातील शिक्षकांकडून मिळाली .
गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये या विद्यालयाचे मुख्याध्यापक हांडे प्रसाद पर्यवेक्षिका अनघा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी इयत्ता दहावी वर्गात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय पोट तिडकेने शिकवण्याचे उत्कृष्ट काम त्यांनी केले असून वेळोवेळी पालकांच्या मीटिंग घेणे शिक्षक पालक विद्यार्थी यांचा एकत्रित मेळावा घेऊन आपला पाल्य कुठे कमी पडतो तो खरोखर अभ्यास करतो का नाही करत तो अभ्यास करत नसेल तर ते पालकांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे याबाबत मार्गदर्शन केल्यामुळे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून त्याचे श्रेय हे शिक्षकांना जात आहे.
विद्यालयात प्रथम क्रमांक धमाले समर्थ विक्रम 96.20 टक्के द्वितीय क्रमांक बोराडे ऋग्वेद प्रवीण 95 टक्के तृतीय क्रमांक ढेरंगे यश भाऊसाहेब 94.80 टक्के चतुर्थ क्रमांक ढोमसे साई धर्मेंद्र 94 टक्के पाचवा क्रमांक डोके सानिका रवींद्र 93. 80 टक्के वरील प्रमाणे विद्यार्थ्यांचे एक ते पाच क्रमांक असून ग्रामस्थांचे वतीने विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर त्याचप्रमाणे सुनील जी थोरवे साहेब अप्पर जिल्हाधिकारी रायगड आणि सरपंच प्रदीप थोरवे उपसरपंच वैशाली थोरवे पोलीस पाटील अमोलजी थोरवे तसेच सर्व ग्रामपंचायत आजी माजी सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.