जुन्नर तालुका प्रतिनिधी:- रविंद्र भोर

सालाबादप्रमाणे गुरुवार दि:-२३ मे रोजी बुद्धपौर्णिमा निमित्ताने ओतूर वनपरिक्षेत्र अंतर्गत अकरा पाणवठ्यांवर सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजणे पर्यंत या १२ तासाच्या दरम्यान प्राणी गणना पूर्ण करण्यात आली अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र आधिकारी वैभव काकडे यांनी दिली. यासाठी वनविभागातील एकूण अकरा पाणवठे ठिकाणे निवडणून या परिसरात ट्रॅप कॅमेरे,मचाण बांधून तयार करण्यात आली होती यासर्व सुविधांचा उपयोग करून वनकर्मचारी रात्रभर पहारा देऊन प्राण्यांचे ठसे,आवाज,विविध प्रकारचे फोटो यामधून प्राणी व पक्षी यांच्या अस्तित्वाची नोंदी घेत होते व त्यांच्या साह्याने विविध जंगली प्राण्यांची व पक्ष्यांची गणना करण्यात आली.यामध्ये तृणभक्षी,मांसभक्षी, प्राणी व पक्षी दिसून आले.

सदर गणनेतून चिंकारा, नीलगाय, भेकर, रानडुक्कर, पाणवठ्यावर वानर,साळुंदर, मुंगूस,माकड ,तरस,कोल्हा,बिबट,सांबर,रानमांजर,भेकर,ससा हे प्राणी तर बुलबुल,रानबगळा, घार,घुबड,होला,मोर,लांढोर, होला, किंगफिशर, कोयल,बार्बेट, रॉबिन,टिटवी हे पक्षी दिसून आले.या प्राणी व पक्षी गणनेमुळे वन्यप्राणी व वन्यपक्षांचे अस्तित्वदिसून आले व यानुसार वनविभागाला या प्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे.

यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नवी दिल्ली मार्फत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ अंतर्गत ओतूर वनपरिक्षेत्र भागात १ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान प्राणी गणना करण्यात आली होती.

सदर प्राणी गणना जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते,सहायक वनसंरक्षक अमित भिसे,ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक,वनमजुर व संरक्षक मजूर ओतूर वनविभाग यांच्यासह राबविण्यात आली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button