शिरूर शहरात सकाळपासून शांततेने मतदान प्रक्रिया पार पडत होती. सकाळी 11 वाजेपर्यंत 25% मतदान प्रक्रिया पार पडली असताना उन्हाचा तडाका प्रचंड होता. त्यामुळे मतदार चार वाजेनंतर मतदान केंद्रावर तुफान गर्दी करताना दिसत होते .

शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे एकूण मतदान ३८३३ झालेले मतदान २३५९ टक्केवारी ६१.५४

कवठे येमाई/ मुंजाळवाडी एकूण मतदान ६७१५ झालेले मतदान ४२७५ टक्केवारी ६३.६६

निमगाव दुडे/ दुडेवाडी एकूण मतदान १४२२ झालेले मतदान ९६६ टक्केवारी ६७.९३

आमदाबाद एकूण मतदान १८७० झालेले मतदान ११८३ टक्केवारी ६३.२६

मिडगुलवाडी एकुण मतदान ८०६ झालेले मतदान ४४६ टक्केवारी ५५.३३

रावडेवाडी एकूण मतदान ९१० झालेले मतदान ५८७ टक्केवारी ६४.५०

मलठण/शिंदेवाडी/लाखेवाडी एकूण मतदान ५१६५ झालेले मतदान ३१४३ टक्केवारी ६०.८५

जांबूत एकूण मतदान २५९१ झालेले मतदान १६४० टक्केवारी ६३.२९

शरदवाडी एकूण मतदान ८५२ झालेले मतदान ६१९ टक्केवारी ७२.६५

पिंपरखेड एकूण मतदान ३३७२ झालेले मतदान २१४२ टक्केवारी ६३.५२

काठापुर एकूण मतदान ८४५ झालेले मतदान ६३६ टक्केवारी ७५.२६

चांडोह एकूण मतदान १४५२ झालेले मतदान ९०० टक्केवारी ६१.९८

वडनेर एकूण मतदान १७१९ झालेले मतदान १२५२ टक्केवारी ७२.८३

फाकटे एकूण मतदान १०९५ झालेले मतदान ७६७ टक्केवारी ७०

टाकळी हाजी/ माळवाडी एकूण मतदान ५७९४ झालेले मतदान ४०७५ टक्केवारी ७०.३३

म्हसे एकूण मतदान ८२६ झालेले मतदान ५४४ टक्केवारी ६५.८६

डोंगरगण एकूण मतदान ७५९ झालेले मतदान ५११ टक्केवारी ६७.३२

शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे मतदान प्रक्रियेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

शिरूर शहरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह तुफान पावसामुळे मतदान प्रक्रियेवर मोठा परिणाम झाल्याच्या दिसून आले, शिरूर नगरपालिकेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सेंटर शाळेमध्ये ग्रीन बुथ् ही संकल्पना राबवून मतदारांना उन्हापासून होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर शहरात फेरफटका मारत मतदानाचा आढावा घेतला. तर शिरूर चे स्थानिक आमदार अशोक पवार यांनीही शिरूर शहरातील मतदान प्रक्रियेचा आढावा घेत मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.

शिरूर तालुक्यात सरासरी 44%टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली . शेवटच्या एक तासांमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मतदानावर खूप मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्प्ष्ट होईल .

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button