(क्षणोक्षणी निराकार प्रभूच्या प्रति समर्पित होऊन जीवन जगावे ):-सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

दिल्ली,१४ मे,२०२४ जेव्हा आपण क्षणोक्षणी या निराकार प्रभुच्या प्रति पूर्ण समर्पित होऊन आपले जीवन जगतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होऊन जाते.असेच प्रेमा-भक्तिने परिपूर्ण जीवन बाबा हरदेवसिंहजी यांनी स्वतः जगून आम्हाला दाखवले. असे अशिर्वचन सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी ‘समर्पण दिवस’च्या पावन प्रसंगी व्यक्त केले.

युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ ‘समर्पण दिवस’ समागमाचे आयोजन 13 मे रोजी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या सान्निध्यात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे करण्यात आले.दिल्ली,एन.सी.आर.सह आजूबाजूच्या राज्यांतून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगणानी या कार्यक्रमात सहभागी होऊन बाबाजींच्या परोपकारांचे केवळ स्मरणच केले असे नव्हे तर त्यांना हृदयपूर्वक श्रद्धा सुमने अर्पित केली.या शिवाय हा दिवस विश्वभर देखील आयोजित करण्यात आला. सर्व ठिकाणी समस्त भक्तांनी बाबजींच्या दिव्य शिकवणुकीचे स्मरण करत त्यांच्या अनुपम जीवनाला नमन केले.

मानवतेचे मसीहा बाबा हरदेवसिंहजी यांच्या शिकवणुकीची चर्चा करताना सदगुरु माताजी म्हणाल्या,की बाबाजींनी स्वतः प्रेमाचे मूर्तीमंत रूप बनून निस्वार्थ भावनेने जीवन जगण्याची कला शिकवली. माताजीनी सांगितले, की जेव्हा आपण परमात्मयावर खरे प्रेम करु लागतो तेव्हा मायावी संसारातील लाभहानीचा प्रभाव आमच्यावर पडत नाही. त्या परिस्थितीत प्रभू प्रेम आणि प्रभू इच्छाही सर्वोपरि बनून जाते.याउलट जेव्हा आपण स्वतःला ईश्वराशी न जोडता भौतिक वस्तुंशी जोडून राहतो तेव्हा क्षणभंगुर सुख-सुविधांच्या प्रतिच आपले ध्यान केन्द्रित असते. त्यामुळे आपण त्याच्या मोहात फसून प्रायः वास्तविक आनंदापासून वंचित राहतो.

वास्तविकता तर हीच आहे, की खरा आनंद केवळ या प्रभुशी नाते जोडून निरंतर याची स्तुति करण्यात साठला आहे. संतांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन तो प्राप्त केला जाऊ शकतो. भक्ताच्या जीवनातील हेच मूलभूत सार आहे. परिवार, समाज व अवघ्या विश्वामधे स्वतः प्रेममय बनून प्रेमरूपी पुल बांधावेत कारण समर्पण व प्रेम हे दोन अनमोल शब्दच संपूर्ण प्रेमाभक्तिचा आधार असून त्यामध्ये सकलांच्या भल्याची सुंदर भावना निहित आहे.

समर्पण दिवस समागमात दिवगंत संत अवनीतजी यांच्या निस्वार्थ सेवेचे वर्णन करताना सदगुरु माताजी म्हणाल्या, की त्यांनी सदैव गुरुचा सेवक बनून आपली खरी भक्ति व निष्ठा निभावली, कोणत्याही नात्याशी जोडून राहिले नाहीत. या समागमात मिशनच्या अनेक वक्त्यांनी बाबाजींच्या प्रेम, करूणा, दया व समर्पण आदी दिव्य गुणांचे वर्णन गीत, भजन व कवितांच्या माध्यमातून व्यक्त केले. निःसंदेह प्रेमाचे मूर्तिमंत रूप असलेले बाबा हरदेवसिंहजी यांची करूणामय अनुपम छबी प्रत्येक श्रद्धालु भक्ताच्याके हृदयात अमिट छाप बनून राहिली असून त्यांच्या अनंत उपकारांबद्धल निरंकारी जगतातील प्रत्येक भक्त सदैव ही ऋणी राहील.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button