जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर


जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ता:-जुन्नर येथील लेंडे स्थळ या ठिकाणी एक बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असून शुक्रवार दि:-१३ मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाचवा बिबट्या जेरबंद झाला असून हा बिबट मादी ५ ते ६ वर्षे वयाचा असून पूर्ण वाढ झालेला आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.
यापूर्वी बिबट्याने याच पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे एका शेतमजूर महिलेवर हल्ला त्यानंतर काळवाडी परिसरातील मुंजाबा वस्ती येथे मामाकडे यात्रे साठी आलेल्या आठ वर्षीय रुद्र फापाळे या बालकावर हल्ला करून त्याला ठार केले त्यानंतर याच परिसरात गोठ्यातील एका वासरावर हल्ला करू त्याला जखमी करण्याच्या घटना घडल्या आहेत. गेली आठ दिवसात या परिसरात बिबट्यांनी हल्ल्याचा कहर मांडला असून पिंपरीपेंढार येथील गाजरपटात नानुबाई कडाळे या बाजरीचे राखण करणाऱ्या महिलेवर दोन बिबट्यांनी हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी आहे
दरम्यान पिंपळवंडी व काळवाडी पिंपरी पेंढार परिसरात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत.रेस्क्यू टीमचे लोकही या आजूबाजूच्या परिसरामध्ये तळ ठोकून गस्त देखील घालत आहेत.यापूर्वी वनविभागाने चार बिबटे जेरबंद केलेले असताना सोमवार दि:-१३ मे रोजी पहाटे ०४ वाजता पाचवा बिबट्या जेरबंद केला असून दरम्यान वन विभागाने पकडलेला बिबट्या हा रुद्र फापाळे या बालकावर हल्ला करणारा आहे का? अथवा नाही? याबाबतचा खुलासा अद्यातरी झालेला नाही.आणि आता सदर पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने रूद्र या बालकावर हल्ला केला त्या ठिकाणच्या बिबट्याच्या पाऊल खुणाचे ठसे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने घेतलेले आहेत.माणिकडोह निवारा केंद्रात दाखल करण्यात आलेल्या बिबट्याच्या पंजाचे देखील ठसे घेतले जाणार असून दोन्ही ठसे यांची जुळवणी केली जाणार असून ते जुळतात किंवा नाही त्यानुसार आयुषवर हल्ला करणारा हाच बिबट्या आहे का ? याबाबतचा खुलासा होऊ शकेल, असे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले. याशिवाय उदापुर येथील भैरवनाथ नगर मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी सांगितले.


यावेळी या सर्व परिसरात अद्यापही ९ ते १० बिबटे असावेत,असा प्राथमिक अंदाज स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.पिंपळवंडी व काळवाडी परिसरामध्ये रुद्र फापाळे या बालकावर हल्ला करणारा बिबट्या जोपर्यंत सापडत नाही,तोपर्यंत वनविभागाचा सर्व फौजफाटा व यंत्रणा याच ठिकाणी ठेवली जाणार असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले आणि कोणत्याही परिसरामध्ये बिबट्या संदर्भात काही उपद्रव दिसून आल्यास वनविभागाच्या स्थानिक कार्यालयाशी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा जुन्नर येथील वनविभागाच्या कार्यालयाची संपर्क साधून याबाबतची तातडीने माहिती द्यावी असे आवाहन देखील सातपुते यांनी केले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button