जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
काल बुधवार दि:-८ मे रोजी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य अशी रेकॉर्ड ब्रेक जाहीर सभा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.ही सभा शिवाजी– दादांच्या विजयाची ग्वाही देणारी सभा ठरणार यात शंकाच नाही असे उदगार राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी काढले मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार मा.शिवाजीदादा आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हा समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना केले.
या सभेला मतदार बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला तसेच या सभेला भाजपा प्रवक्ते आमदार प्रविणजी दरेकर, मंगलदास बांदल,शिवसेना कामगार नेते इरफानभाई सय्यद,जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके,माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या व भाजपा नेत्या आशाताई बुचके,बाजार समिती सभापती संजय काळे, बाजार समिती उपसभापती दिलीप डुंबरे,ओझर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे, ओतूरच्या सरपंच छायाताई तांबे,उपसरपंच प्रशांतजी डुंबरे,ओतुरचे मा.सरपंच धनंजयजी डुंबरे, भाजपा नेते संतोषनाना खैरे,पुणे जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष अरुण गिरे, प्रदीप वळसे पाटील,उद्योजक देवेंद्रशेठ शहा, पंचायत समिती मा.सभापती विशालजी तांबे, मा.जिल्हा परिषद सदस्य भानुविलासजी गाढवे, मा.जिल्हा परिषद सदस्य विश्र्वासजी आमले मा.जिल्हा परिषद अध्यक्ष देवरामजी लांडे,
यांच्यासह जुन्नर तालुका शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांतजी ढोले,शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ताभाऊ गवारी,युवासेना तालुका प्रमुख विकासभाऊ राऊत,शिवसेना जुन्नर शहरप्रमुख अविनाशजी कर्डिले, युवासेना उपतालुका प्रमुख किरणभाऊ शेटे, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख मयुरेश तांबे तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे सह महायुतीचे इतर घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.