जुन्नर प्रतिनिधी- सचिन थोरवे
चैत्र शुद्ध गुढीपाडवा या दिवशी जुन्नर तालुक्यातील यात्रेची सुरुवात शिरोली बुद्रुक गावच्या यात्रेपासून सुरुवात होत असते शिरोली बुद्रुक गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये सकाळी नऊ वाजता विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांच्या शुभहस्ते भैरवनाथ महाराज जोगेश्वरी माता यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे मुक्ताई देवीलाही सत्यशील दादा शेरकर आणि विष्णू दादा थोरवे सचिव कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतरसालाबाद प्रमाणे याही वर्षी शिरोली बुद्रुक अखंड हरिनाम सप्ताह गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायाच भूषण ह भ प मुरलीधर भाऊ थोरवे यांच्या शुभहस्ते विना पूजन संपन्न झाले त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पूजन करून ज्ञानेश्वरी पारायण ह भ प गजानन महाराज काळे यांच्या नियोजनात संपन्न होणार असून किर्तन मंडपात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व वारकरी गावातील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या सात दिवसात महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन रुपी सेवा सात ते नऊ या वेळेत होणारा असून रात्री नऊ नंतर सर्व भाविकांना दानशूर व्यक्तींकडून अन्नदान करण्यात येणार आहे याचे सर्व नियोजन गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात आले आहे काल्याचे किर्तन झाल्यानंतर या ठिकाणी आमटी भाकरी नैवेद्य देऊन सर्व भाविकांना अन्नदान करण्यात येणार आहे