प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

शिक्षक हीच खरी समाजाची साधन संपत्ती असूल समाज परिवर्तनाची ताकद शिक्षकांमध्ये असल्याचे मत मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नं 2 येथून सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक सौ.मीनाक्षी गुलाबराव गवळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभाच्या निमित्ताने बोलत होते.

कार्यक्रमाला शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.आरतीताई भुजबळ,शि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सेकंडरीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके,महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेचे अध्यक्ष अनिल पलांडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, पुणे विभागाचे संघटनमंत्री रामदास अभंग, संदीप ढमढेरे,माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई थिटे,मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ,संजय मांढरे,महाराष्ट्र राज्य अपंग शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शंकर शिंदे,विलास पाटील,जगदीश राऊतमारे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे कार्यवाह महेश शेलार,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे,पुरंदरचे अध्यक्ष शिवहार लहाने उपस्थित होते.

आधुनिक शिक्षण पद्धतीत शिक्षकांनी स्वत:ला बदलणे आवश्यक असून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ,विद्यार्थी केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button