जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे वातावरणात बदल होत आहे निसर्ग चक्र बदलले वातावरण ढगाळ हवामान स्थिती होत आहे.झाडाझुड पानी पानगळीची कात टाकली.पावसाळ्यातल्या रानभाज्या कधीच लुप्त झाल्या जमिनीच्या गर्भात कंदरुपी बीज रुपी गुप्त झाल्या.उन्हाळी भाज्यांचे आयुष्य जास्त असते भर चैत्र वैशाखात तप्त उन्हाळ्यातही आपले अस्तित्व राखून ठेवतात.चैत्र पालवी फुटली,कोंब फुटले.पानगळ होऊन निसर्गदत्त वातावरण खुलले उन्हाळ्याच्या झळा वाढायला लागल्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असतानाही निसर्ग जैवविविधतेने नटलेले आहे . निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या कुशीत परिसरात अशा काही बहुगुणी रानभाज्या आहेत.वाड वडिलांनी पिढ्या न पिढ्या राखून ठेवल्या वनऔषधी पौष्टिक रानभाजी वानोळा परंपरागत संस्कृती जपली.आदिम काळापासून आवडीने शिजवून खाल्या जातात रान पालेभाज्या,रानकंद भाज्या,रानफळ भाज्या,रानफुलोराभाज्या,शेंगभाज्या वेलवर्गीय भाज्या,देठ कोंब भाज्या आहेत मात्र या सर्वरानभाज्या नामशेष होताना दिसत आहेत.यातील काही भाज्या आजही आदिवासी बांधव उपयोग करताना दिसून येतात.
:–भोकर–:भोकराची फळ भाजी,भोकर मोहर भाजी,भोकर कोवळ्या पानांची भाजी ,कोवळे कोंब भाजी, कोवळ्या फळांची भाजी चिकट असते.अनेक औषधी गुणधर्म असतात पित्त नाशक,पाचक पौष्टिक असते.मुळव्याधीवर उपयुक्त असते
:–शेवाळ भाजी–:शेवाळ कंद भाजी शेवाळ घाट भाजी करतात भाजी खवखवते त्यात चिंचेचे पाणी टाकतात,पौष्टिक भाजी आहे शेवाळ सोलून साफ करतात चिंचेचे आंबट पाणी टाकतात ग्रेव्ही मटण मसाला वाटून करतात.दिसते तपकिरी रंग असतो डोंगर कडे कपारीत किंवा रानात खुप शोधावी लागते ही थोड्या दिवसात पंधरा ते वीस दिवस भाजी टिकते हि भाजी पाऊस पडायच्या सुरवातीला मिळते शेवाळ भाजीचे कंद मातीत लुप्त झाले तरी हवेच्या गारव्यात कोंब पुन्हा फुटतात.आतड्याचे आजार,मूत्र विकार दूर होतात,वजन कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
:–असवला भाजी–:असवला हे झुडूप असते भर उन्हाळ्यात त्याला पांढरी सफेद फुले येतात .कांदा घालून त्याची भाजी केली जाते पोटदुखी विकार दुर होतात कुसुर भाजी घुसरे वेलवर्गीय झाड आहे त्याला छोटी छोटी तुरडाळीच्या आकाराएवढी फळे येतात छोटी छोटी फळे तोडून ती खूप शिजवून घ्याव्या लागतात शिजवून घुगऱ्या केल्या जातात वाटण करून डाळ वाटली जाते त्याचा कालवण पोळ्या करतात .चवीला तुरट गोड लागते अनेक पौष्टिक गुणधर्म असतात.सध्या हि भाजी आहारातून कमी झाली आहे.
:– पंधा कंदमुळ भाजी–:कंद उकडून खातात कंद वाटून पीठ करुन भाकरीपण करतात हि भाजी आहारातून कमी झाली आहे
:–घायपात–:उन्हाळ्यातील घायपाताला कोंब तुरे शेंडे फुटतात त्या शेंडे सोलून भाजी केली जाते आतड्याचे आजार कमी होतात.पोटदुखी वर गुणकारी आहे.
:–सायरधोडे–:काटे सायर ला फळे येतात फळे कापून वाळवतात त्याची भाजी करतात चिकट असते चवीला तुरट असते सांधेदुखी,हात पाय दुखीवर उपकारी
:–उंबर–:उंबराच्या छोट्या कोवळ्या फळांची सुकी भाजीतसेच सार बटाट्या सारखी भाजी उंबर फळांचे पीठ करुन भाकरी पण पुर्वी करत होते गोवर आजारांवर गुणकारी,
:–आळवा–:अळू झाडाच्या छोट्या कोवळ्या फळांची चिरून वाळवून भाजी केली जाते.हिरवी हिरवी फळे असतात.कफ पित्त वात दोषावर उपकारी
:–आंबा–:आंबा चटणी,कढी,गुळ आंबा,मुरांबा आंबा कैरी पासून आंबा उकळून गरापासून कढी केली जाते.गुळ आंबा केला जातो.पिकलेल्या आंब्यापासून आमरस केला जातो.
:–करवंद–:करवंद ठेचा..पिकलेल्या करवंदाची कढी करतात
:–मोहटा–:मोहाच्या फळांची भाजी कोवळी फळे चिरुन फोडूनशिजवून करतात.
:-कांगवणी–:कांगवणीच्या छोट्या छोट्या फळांची भाजी तयार करतात चटणी करतात.वात आजारावर बहुगुणी आहे
:–कवदर(रानकेळी)–:उन्हाळ्यात कंद उकडून खातात सोंडग्याची घायपात प्रमाणे भाजी करतात.
:–बांबू कोंब–:बांबूच्या कोंबाची भाजी केली जाते.पावसाळ्यात खुप नैसर्गिक रानभाज्या असतात हैंदा,चावा,पंधा,आनवा, चिचूरडी, तेरा,अशाप्रकारे वनस्पतींची माहीत नसलेल्या अनेक भाज्या आहेतनैसर्गिक निसर्गात आहारांच्या भाज्या आहेत बिगर खताच्याकोरोना महामारीच्या काळात बऱ्याच ठिकाणी आदिवासी भागात भाज्यांचा वापर झाला अशा प्रकारच्या भाज्या वेगवेगळी फळे मिळवताना जंगल तुडवावे लागते
या भाज्या निसर्गातच उगवल्या जातात वाढल्या जातात सिमेंटचा जंगलात रानातले ही बदललेली भाजी कमी होत चाललेली आहे काही ठिकाणी वापरण्याचे माहित नाही तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या बाजार दुर्लक्षित होत चाललेले आहे नामशेष होत आहेत भाज्यांचे गुणधर्म फायदे तोटे माहीत करणे महत्त्वाचे आणि निसर्गाचा ठेवा जपून ठेवला पाहिजे बागायती भाज्यांमुळे अपरिचित झालेल्या आहेत अशा या हद्दपार झालेल्या भाज्या टिकवणे महत्त्वाचे आहे पुढच्या पिढीसाठी हा ठेवा जपून ठेवायला हवा.हि निसर्गाची अनमोल देणगी आहे. याच आदिवासी भागातील फोपसंडी गावात लहानाचे मोठे झालेले व सह्याद्रीच्या कुशीत आणि अंगा खांद्यावर बागडलेले सध्या जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कुमशेत येथे शैक्षणिक कार्य करीत असणारे ज्यांना निसर्ग कवी म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त कवी यश घोडे फोफसंडीकर यांनी हा रानमेवा माहिती पुढील पिढीला मिळत रहाण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. त्यांनी या विषयावर एक सुंदर कविता केलेली आहे.
*उन्हाळी रानभाज्या*सुरु झाला तप्त उन्हाळा, वाढू लागल्या उन्हाच्या झळा, शिमग्या चैता वैशाखात निसर्ग फुलला, रानात फळ भाजीपाला आला. पिढ्यानपिढ्या जपला वानोळा, शिजवला भोकर,उंबर,आवळा, शेवळं ,कुसर भाज्या हितकारक,
रान सुरण,कांगोणी त्रिदोष हारक. वाडवडीलांनी शिजवून खाल्ल्या,आता आहारातून नामशेष झाल्या, आपल्या आहारात दुर्मिळ रानभाज्यांचा वापर करावा,
बिगर खताच्या वनौषधी भाज्यांचा वानोळा जपून ठेवावा. तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वांनी जपा भाज्यांची श्रीमंतीवनौषधी बहुगुणी रानखाद्याची आता टिकवून ठेवा संस्कृती..