जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
सध्या अनेक क्षेत्रात करिअर करण्यासाठी तरुण तयार आहेत मात्र सर्वांनाच सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही त्यामुळे ज्या तरुणांना नोकरी मिळाली नाही त्यांनी नाराज न होता आपल्या कला कौशल्य आत्मसात केलेल्या शिक्षणाचा उपयोग करून ग्रामीण भागात उद्योग सुरु करुन इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे.ग्रामीण भागातील आवश्यक व्यवसायिक संधी लक्षात घेऊन व्यवसाय उभारावे असे वक्तव्य जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहित ढमाले यांनी हिवरे खुर्द ता:-जुन्नर येथील शिवमुद्रा मेडिकलच्या उदघाटन प्रसंगी केले.
शनिवार दि:-३० मार्च रोजी जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्द येथील सुप्रिया लक्ष्मण वायकर या नवं उद्योजक महिलेने नव्याने सुरू केलेल्या शिवमुद्रा मेडिकल चे उदघाटन आपल्या सासू व सासरे जनाबाई दशरथ वायकर यांच्या शुभहस्ते केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,डॉ,अवधूत वलव्हनकर,डॉ.आदिती वलव्हनकर,डॉ.राहुल वायकर,डॉ.सौरभ वायकर,उदापुर माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन वलव्हनकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर,ट्रस्ट अध्यक्ष अशोक वायकर, उपाध्यक्ष नारायण वायकर,पोलीस पाटील किरण भोर,हिवरे खुर्द सरपंच:-मनिष बर्डे,हिवरे बु:सरपंच निलेश बेनके,धोलवड सरपंच नलावडे,नेतवड उपसरपंच पोपट गायकवाड,उपस्थित होते
या उदघाटन प्रसंगी लक्ष्मण वायकर विजय फापाळे निर्मला थोरात,अमोल शेळके,विक्रम भोजने,प्रदीप मुरादे, प्रसाद पानसरे, चिंतामण कवडे,विश्वास वायकर, केरभाऊ शिर्के,माऊली वायकर,यशवंत येंधे,कृष्णा लोखंडे,दत्ता येंधे,सागर वायकर,निलेश वायकर,उमेश वायकर, अतुल वायकर,जनार्दन वायकर,राजू येंधे, जाधव सर, पाटीलबुवा वायकर,प्रकाश वायकर सर,रोहिदास वायकर सर,शंकर वायकर,संतोष मोरडे,सुरेश येंधे,चंद्रकांत येंधे आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.