जुन्नर तालुका प्रतिनिधी :- रविंद्र भोर
उदापुर ता;- जुन्नर येथील गावकरी सार्वजनिक होळी सण व वीरांचा पाडवा सण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची रिवाज चालत आला आहे सर्व गावकरी मोठया उत्स्फूर्तपणे हा सण साजरा करीत आहेत मात्र यावर्षी रविवार दि:-२४ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होळी व सोमवार दि:-२५ मार्च रोजी वीरांचा पाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उदापुर गाव वसल्यापासून हिंदू ,मुस्लिम व इतर धर्माचे लोक एकत्रीत पद्धतीने सर्व सण,उसत्व गुण्या- गोविंदाने साजरे करत आले आहेत.यामध्ये कितीही वाईट काळात देखील कोणत्याही सण,उसत्व रद्द करण्यात आले नाहीत मात्र यावर्षी गावातील काही जथ्यांना सुतक पडल्याने सणाला थोडा जनसमुदाय कमी उपस्थित होता.
या सणाला उदापुर गावात हिंदू परंपरेने साजरी करण्याची रीत आहे यामध्ये ग्रामविकास मंडळ महत्वाची भूमिका पार पाडत आहे. सर्व गावातून वाजंत्री लावून गोवऱ्या व निकामी लाकडांचे ओंडके गोळा करण्याचे काम भिल्ल समाज करून होळी तयार करतात तर गावातील मुस्लिम समाज वाजंत्रीचे काम करीतअसायचा मात्र सध्या मुस्लिम वाजंत्री कलाकार नसल्याने हे काम मुरली जाधव नवनाथ भले या ठाकर समाजातील कलाकारांनी सणाला चार चांद लावले
हनुमान मंदिर समोर होळी साठी खाच करून होळी सजविण्यात कातकरी व भिल्ल समाज करीत असे त्यानंतर गाव ब्राम्हण पूजेचे मानकरी थोरले शिंदे पतीलव देशमुख यांच्याकडून पूजन करून होळीला अग्नी लावला जात त्यानंतर गावातील प्रत्येक गावकरी आपल्या घरासमोर असणाऱ्या होळीला अग्नी लावण्यासाठी सार्वजनिक होळीला नैवद्य दाखवून पेटलेली गोवारी घरी आणून घरासमोरील होळी पेटविली जाते
होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी ज्या योध्यांना पानिपतच्या लढाईत वीर मरण आले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वीरांचा पाडवा सण साजरा करण्यात येतो.यामध्ये प्रत्येक घरातील एक मुलाला वीरा प्रमाणे सजवून होळी भोवती गोलाकार फिरून युद्ध लढले जात मात्र यावर्षी त्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात खंड पडू न देत सर्व गावकरी आबालवृद्ध वीर योध्यांनी युद्ध करीत श्रद्धांजली वाहिली माळशेज पट्ट्यातील इतर गावात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे .