जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी आपले वडील स्वर्गीय शंकर कोंडाजी शिंदे यांच्या साडेपाच महिन्याच्या श्राद्ध कार्यक्रमाच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशन जुन्नर, पुणे व श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने उदापूर येथील दीपक शिंदे व परिवाराने पंचक्रोशीतील जवळपास ७५ आजी आजोबांना आधार काठ्यांचे वाटप करून व हृदयरोग व मूत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करून नवा आदर्श लोकांपुढे ठेवला आहे.या शिबिरात शेकडो ग्रामस्थांनी आपली तपासणी करून घेतली. यावेळी ह.भ.प.निलेश महाराज कोरडे किल्ले शिवनेरी यांनी किर्तन सेवेतून उपस्थितांना प्रबोधन केले.किर्तनाला वै.कोंडाजी बाबा डेरे आश्रमातील वारकरी मुलांनी साथ दिली.या कार्यक्रमाचे आयोजन दीपक शिंदे व समस्त थोरले शिंदे पाटील यांनी केले होते.
यावेळी उदापुर गावचे सरपंच सचिन आंबडेकर डिसेंट फाउंडेशन संस्थापक जितेंद्र बिडवई, सेक्रेटरी फकीर आतार,एकनाथ डोंगरे,पांडुरंग मोढवे, भिवाजी माळवे,शंकर भिसे,बाजीराव भोर,शरद लेंडे, अशोक घोलप,शरदअण्णा चौधरी, तुषार थोरात, तुळशीराम भोईर,जी.के. लांडे,श्याम माळी,भगवान घोलप,विकास राऊत,प्रभाकर शिंदे, ह.भ.प.गणेश महाराज शिंदे,रोहिदास शिंदे,जालिंदर शिंदे,साहेबराव तांबोळी,अमोल म्हसणे,निलेश नारुडकर,विनोद भोर,प्रमिला शिंदे,समस्त ग्रामस्थ उदापूर,महिला भगिनी व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
:-:माझ्या वडिलांचे निधन हे हृदयविकाराच्या झटक्याने झाले याची मोठी खंत मनाला वाटत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले हृदयाची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे यासाठी श्री हॉस्पिटल आळेफाटा यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी व मूत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले. त्याचप्रमाणे आजी-आजोबांना आधार देण्यासाठी डिसेंट फाउंडेशन जुन्नर, पुणे यांच्या मदतीने आधार काठ्यांचे वाटप केले असून हीच माझ्या वडिलांसाठी खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते. दीपक शिंदे.