प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे
श्री मनशांती छात्रालयामध्ये असणाऱ्या मुलांमधील हुशारी ओळखून त्यांना गुणवत्तापूर्ण तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले ते माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई थिटे होत्या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या सचिव कमलावती थिटे, खजिनदार तानाजीराव थिटे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे,मैत्रेयी थिटे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके,पेन,पेन्सिल याशिवाय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलर व चित्रकला वह्यांचे वाटप करण्यात आले भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तालुक्यांमध्ये काम करणार असून वेगवेगळ्या शालेय स्तरावरील शिष्यवृत्ती,सैनिकी प्रवेश परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा,पोलिस भरती, विविध अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा,लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून साधनसुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई थिटे यांनी सांगितले तर तर प्रतिष्ठानच्या ह्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला उपाध्यक्ष सविता थिटे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रोकडे यांनी तर आभार विनय सपकाळ यांनी मानले.