शुभम वाकचौरे
जांबूत ( ता :शिरूर ) जांबूत येथे हनुमान मंदीरा समोर ४० वर्ष जुने वडाचे झाड असून आदरणीय सरपंच यांनी कुठली रीतसर वन विभागाची परवानगी न घेता झाडाच्या फांद्या व डहाळ्या तोडल्या आहेत. वारंवार वृक्ष लागवड करण्यास सांगूनही त्यांनी झाडे न लावता वृक्षतोडीची मोहीम हाती घेतली आहे. असे जांबुत ग्रामपंचायत सदस्य राहुल रावसाहेब जगताप यांनी सांगितले आहे.
वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.अशाप्रकारे विनापरवानगी वृक्षतोड / वृक्षछाटणी करून पर्यावरणाला हानी पोहचविणे हा गुन्हा आहे .त्यामुळे पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी त्यासाठी कार्यरत असणा-या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते.
सदर घटना वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे व त्यांना रीतसर कारवाईची मागणी देखील केली आहे. सदर कारवाई न झाल्यास जांबुत ग्रामपंचायत सदस्य राहुल रावसाहेब जगताप यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.