शिरूर प्रतिनिधी – शकील मनियार
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. सुनीता पोटे यांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ.सुनिता पोटे यांनी राई प्रतिष्ठान संचलित मीरा नर्सिंग होम गेले 25 वर्ष गोरगरीब ग्रामीण भागातील महिलांना शिरूर येथे अल्प दरात तर कधी मोफत डिलिव्हरी सेवा देतात राजन खान यांच्या अक्षर मानव संघटनेच्या आरोग्य विभागाच्या राज्यप्रमुख ही म्हणून ते काम पाहतात ओमस आर्ट प्रोडक्शन हाऊस चालवतात त्याच बरोबर शाळेमध्ये नर्सिंग होम च्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयी मार्गदर्शन करतात.त्यांचे चांगले कार्य पाहून त्यांच्या कार्याची दखल घेऊन द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुक्याच्या वतीने त्यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 2024 चा स्त्री शक्ती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पीआय ज्योतीराम गुंजवटे द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, अहमदनगर खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब काळे, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत साठे,पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, तालुकाध्यक्ष शकील मनियार ,तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड माजी आदर्श सरपंच तात्यासाहेब सोनवणे, ॲड. रवींद्र खांडरे माजी उपसरपंच निलेश सोनवणे, युवा उद्योजक कमलेश बुऱ्हाडे ,पत्रकार फैजल पठाण ,पत्रकार फिरोज सिकलकर, संचालक संतोष लटांबळे आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.