द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन.
शुभम वाकचौरे
जागतिक महिला दिनानिमित्त द युवा पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा सन्मान!जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने द युवा ग्रामीण पत्रकार संघटना शिरूर यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, पी आय ज्योतीराम गुंजवटे, कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर संचालक बाबासाहेब काळे, पत्रकार हेमंत साठे, पुणे जिल्हा अध्यक्ष रिजवान बागवान, शिरूर तालुका अध्यक्ष शकील मनियार, शिरूर तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब सोनवणे, माजी उपसरपंच निलेश सोनवणे मेजर, युवा उद्योजक कमलेश बुऱ्हाडे, संचालक संतोष लंटाबळे ॲड. रवींद्र खांडरे, प्राध्यापक जितेंद्रकुमार थिटे, पत्रकार फैजल पठाण, सिटी इंडिया न्यूज चैनल चे पत्रकार शुभम वाकचौरे, पत्रकार फिरोज सिकलकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पी आय ज्योतीराम गुंजवटे यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की कर्तुत्वान महिलांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.
समाजातील आदर्शवत महिलांचे कार्य समोर ठेवून महिला सशक्तिकरण करणे शक्य आहे. महिलांमध्ये समस्या सोडवण्यासाठी तसेच संरक्षणासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे देखील त्यांनी सांगितले. द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांविषयी हे जग अपूर्ण आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही आज प्रत्येक ठिकाणी महिला आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज काम करत आहेत महिलांचे कर्तृत्व अधिक सक्षम करण्यासाठी आणि महिलांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.द युवा ग्रामीण पत्रकार संघ शिरूर तालुका आयोजित जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख होते.
यावेळी द युवा पत्रकार संघाच्या वतीने सरपंच जिजाबाई दुर्गे,माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या अध्यक्ष जिजाबाई थिटे,सरपंच मंगलताई कौठाळे,डॉ.सुनीता पोटे,आदर्श शिक्षिका सुजाता रासकर,सरपंच शोभा तरटे अशा एकुण १५ कर्तुत्ववान महिलांना सन्मानित करण्यातआले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर नगर चे संचालक बाबासाहेब काळे, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष रिजवान बागवान, प्राध्यापक जितेंद्रकुमार थिटे, आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे, आदर्श सरपंच मंगल ताई कौवठाळे, डॉ सुनीता पोटे, आदर्श सरपंच सुजाता रासकर,आदर्श सरपंच शोभाताई तरटे या सर्वच मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक विवेकानंद फंड यांनी केले तसेच सर्वांचे आभार शकील मनियार यांनी मानले.