जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 02/03/2024 रोजी सकाळी 11/00 वाचे सुमा.पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व पोलीस पाटील यांची आगामी लोकसभा निवडणुक २०२४ व मराठा मोर्चा अनुशंगाने* कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून,तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील प्रमाणे सूचना दिल्या.
१) आपले ग्रामपंचायतीचे हद्दीमधील व गावामधील मुख्य रस्ते, चौक, रहदारिचे ठिकाणे, कॅनॉलचा रस्ता, मंदिरे, प्रार्थनास्थळे, इ ठिकाणी चांगल्या प्रतीचे नाईट व्हिजन कॅमेरे बसवावे.
२) गावामधील बँका, पतसंस्था, सहकारी तत्वारील इतर महत्वाच्या संस्था यांना सी.सी.टी.व्ही कॅमेरेबसवणेबाबत आपले ग्रामपंचायत कार्यालयामधुन पाठपुरावा करून पुर्तता करून घ्यावी.
३) बाहेरगावांमधुन/तालुक्यांतुन /जिल्हयांतुन /राज्यांमधून आलेले शेतमजुर, परप्रांतिय, भाडेकरू यांची इयंभुत माहीती घेऊन सदर माहीतीची एक प्रत पोलीस स्टेशन येथे दि.१५/०३/२०२४ पर्यंत सादर करावी.
४) जे कुणी सोसायटी, फ्लॅटमालक/घरमालक / बागायतदार शेतकरी तसेच भाडेकरू सदरची माहीती देण्यास टाळाटाळ करतील त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून सदर बाबत ग्रामपंचायत सरपंच/ग्रामसेवक यांनी वेळेत माहीती देण्याची तजवीज ठेवावी.
५) बाहेरगावांमधुन/तालुक्यांतुन /जिल्हयांतुन /राज्यांमधून आलेले शेतमजुर, परप्रांतिय, भाडेकरू यांचे अंत्यविधीकामी ग्रामपंचायत परवानगी घेऊनच अंत्यविधी करणेबाबत ग्रामसभेमध्ये ठराव मंजुर करावा व सदर अंत्यविधीबाबत संबंधित ग्रामपंचयायतने पोलीस पाटील यांना कळविणे अनिवार्य राहील.
६) लोकसभा इलेक्शन संदर्भात गावांमधील संशयित अनोळखी व परप्रांतीय लोकांवर लक्ष ठेवण्याबाबत तसेच दोन राजकीय पक्ष व गटांमधील वाद व इतर राजकीय गोष्टींबाबत गोपनिय माहिती ठेवणेबाबत सुचना दिल्या