जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी बांधवांनीआधुनिक शेती करण्यासह सेंद्रिय आणि जैविक पध्दतीने प्रयत्न करावेत असा सल्ला डॉ.संजीव माने यांनी पिंपळगाव-जोगा ता:-जुन्नर येथील राजगड लॉन्स मधील सभागृहात आयोजित शेतकरी मेळाव्यात दिला.यावेळी बोलताना डॉ.संजीव माने म्हणाले,ऊस उत्पादन वाढीसाठ सेंद्रीय व जैविक खतांचा जास्तीत जास्त प्रमाणावर वापर करावा, शेणखताच मोठ्याप्रमाणात वापर करावा. नसेल तर हिरवळीच्या खतांचा वापर करावा तसेच शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांचा वापर प्रतिएकरी ४० ते ४५ हजार ऊर राखल्यास त्याच बरोबर पाणी व किडरोग व्यवस्थापन केल्यास प्रति एकरी भरघोस् ऊस उत्पादन मिळेल. जमीनीची सुपिकता,ऊस लागणीची योग्यवेळ,रासायनिक खतांच्या मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन या पंचसुत्री व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत ताग,धैंचा बियाणे,ऊस बेणे,ऊस रोपे,जिवाणू खते व व्हीएसआय उत्पादनांचा पुरवठा केला जातो.शाश्वत हमीभाव असलेल्या ऊस पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड करावी असे आवाहन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी शेतकरी मेळाव्यात केले.
यावेळी कृषीरत्न,कृषीभूषण डॉ.संजीव माने, विघ्नहरचे व्हाईस चेअरमन अशोक घोलप,कार्यकारी संचालक भास्कर घुले,सेक्रेटरी अरुण थोरवे,शेतकी अधिकारी सचिन पाटील,जुन्नर बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर माऊली खंडागळे,माजी आमदार बाळासाहेब दांगट,पुणे जिल्हा बँकेचे संचालक तुळशिराम भोईर,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे,अंकुश आमले,मोहित ढमाले,गुलाब पारखे, तुषार थोरात,अनंत चौगुले,प्रगतशील शेतकरी पंकज वामन,बाजीराव मानकर,एकनाथ डोंगरे,जयवंत डोके, मंगेश काकडे,नंदाताई बनकर,सुरेखा वेठेकर,सुरेखा मुंढे,लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे,जितेंद्र बिडवई आदींसह विघ्नहरचे आजी-माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी,विविध गांवचे सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शेतकरी मेळाव्यास संसदरत्न शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले,कांदा,भाजीपाला, फुले आदी तरकारी पिकांना शाश्वत बाजारभाव मिळत नाही.भविष्यात ऊसाला प्रतिटन तीन हजार रुपयांपेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही.त्यामुळे सर्वांनी ऊस लागवडीकडे वळावे.कोवीड काळामध्ये सर्व व्यवहार ठप्प असताना कारखाना सुरु होता. शाश्वत उत्पन्नासाठी ऊस पिक हे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले भविष्यकाळात कारखान्याची गाळप क्षमता ७५०० मे.टन प्रतिदिनी करणान असून १८० दिवसांऐवजी १२० दिवसात पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.भविष्यात पाणीप्रश्न गहण होणार असून त्यासाठी आंदोलन करावे लागेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यास विघ्नहरचे संचालक मंडळ कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अंकुश आमले, ज्ञानेश्वर (माऊली) खंडागळे,अनंतराष् चौगुले,माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी देखील मेळाव्यात मनोगते व्यक्त केली. मेळाव्याचे सूत्रसंचालन शेतकी अधिकारी संदीप जाधव व गणेश मोढवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी मानले.